IPL 2020 : युवराज सिंहचा रोहित-ऋषभला फिटनेसवरुन टोला

आयपीएल 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाने 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आहे.

IPL 2020 : युवराज सिंहचा रोहित-ऋषभला फिटनेसवरुन टोला
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 1:58 PM

मुंबई : आयपीएल 2020 स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या संघाने 18 गुणांसह प्लेऑफमध्ये (IPL2020 Playoffs) प्रवेश केला आहे आहे. संघाने 13 सामन्यांपैकी 9 सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मुंबईच्या संघाने चांगली कामगिरी केली असली तरी कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीमुळे चाहत्यांची निराशा झाली आहे. त्यातच दुखापतीच्या कारणामुळे रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour of Australia) जाहीर झालेल्या तिन्ही संघातून वगळण्यात आले आहे. तर काहीजण रोहितला त्याच्या फिटनेसवरुन लक्ष्य करत आहेत. (Yuvraj Singh took a dig at Rohit Sharma and Rishabh Pant’s fitness saying who cheeks are more fat)

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहनेदेखील (Yuvraj Singh) हिटमॅन रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतची फिटसेनवरुन खिल्ली उडवली आहे. मुंबई इंडियन्सने ट्विटरवर रोहित शर्मा आणि ऋषभ पंतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ते दोघे गप्पा मारताना दिसत आहेत. या फोटोवर कमेंट करत युवीने दोघांची खिल्ली उडवली आहे.

युवीने मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या फोटोवर सलग दोन कमेंट केल्या असून त्या खूप व्हायरल होत आहेत. तसेच चाहतेही त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. युवीने कमेंट केली आहे की, दोघांच्या गालांवरील चरबीवरुन एक स्पर्धा व्हायला हवी.

या कमेंटनंतर युवीने अजून एक कमेंट केली आहे. त्यात युवीने रोहितची पत्नी ऋतिकालाही टॅग केलं आहे. या कमेंटमध्ये युवीने म्हटलं आहे की, कदाचित रोहित पंतला विचारत असेल की, ऋषभ तुझे गाल जास्त मोठे आहेत की माझे?

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा गुडघ्याचे स्नायू दुखावल्याने आयपीएलमधील मागील चार सामने खेळलेला नाही. रोहीतच्या अनुपस्थितीत मुंबई इडियन्सचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड सध्या संघाचं नेतृत्व करत आहे. रोहितच्या अनुपस्थितीतही संघ चांगल्या स्थितीत असून मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला आहे. तरिही रोहित कधी कमबॅक करणार असा प्रश्न त्याच्या आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांच्या मनात आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 : रोहित शर्माच्या कमबॅकबाबत कायरन पोलार्डचं मोठं वक्तव्य

IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

IPL 2020 | “त्याने चेन्नईसाठी सर्व काही दिलं”, गौतम गंभीरकडून धोनीचं कौतुक

आमच्या देशाकडून खेळणार का?, तडाखेबाज खेळीनंतर मुंबईच्या सूर्यकुमार यादवला ऑफर

IPL 2020, MI vs RCB : सामना एक, किस्से अनेक – सूर्यकुमारला डिवचण्याचा प्रयत्न, हार्दिक-मॉरिसचं शाब्दिक युद्ध, रवी शास्त्रींचा ‘सूर्य’नमस्कार

(Yuvraj Singh took a dig at Rohit Sharma and Rishabh Pant’s fitness saying who cheeks are more fat)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.