Video : ‘सचिन पाजी’ला लवकर आराम मिळो, युवराजची प्रार्थना, व्हिडीओमधून वर्ल्डकपच्या आठवणी जागवल्या

युवराज सिंगने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच कोरोनाने बाधित असलेल्या सचिन पाजीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Yuvraj Singh Video

Video : 'सचिन पाजी'ला लवकर आराम मिळो, युवराजची प्रार्थना, व्हिडीओमधून वर्ल्डकपच्या आठवणी जागवल्या
yuvraj Singh
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 3:05 PM

मुंबई :  आज 2 एप्रिल 2021… बरोबर 10 वर्षांपूर्वी महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium Mumbai) श्रीलंकेला हरवून 28 वर्षांनंतर एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप (Cricket Word Cup 2011) जिंकला. याचनिमित्ताने आज खेळाडू त्या अविस्मरणीय विजयाच्या आठवणी जागवत आहेत, आठवणींना उजाळा देत आहेत. 2011 च्या विश्वचषकातील बिनीचा शिलेदार युवराज सिंगने (Yuvraj Singh) ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसंच कोरोनाने बाधित असलेल्या सचिन (Sachin tendulkar) पाजीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Yuvraj Singh Video 2011 Cricket World Cup And yuvi pray For Sachin tendulkar)

सचिन तेंडुलकरसहित 4 भारतीय खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. या चारही खेळाडूंची तब्येत बरी व्हावी, त्यांना आराम मिळावी, अशी प्रार्थना युवराज सिंगने व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. सचिन, युसूफ पठाण, इरफान पठाण, एस बद्रीनाथ यांना कोरोनाने ग्रासलं आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निरगाणीखाली उपचार सुरु आहेत.

व्हिडीओमध्ये युवराज सिंग काय म्हणाला?

आपल्याच भूमीत ज्यावेळी वर्ल्डकप होतो आणि तो करंडक आपण जिंकतो, त्यापेक्षा दुसरा कोणता मोठा आनंद नसतो. आम्ही 2011 ला हा आनंद घेतला. आम्ही घेतलेल्या मेहनतीला फळ मिळालं. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये जे जे सहभागी होते त्या सर्वांची नावं युवराजने व्हिडीओमध्ये घेतली. फायनलमध्ये गौतम गंभीरने खेळलेली 97 धावांची इनिंग्स आणि धोनीच्या 91 धावांची खेळी ही महत्त्वपूर्ण ठरल्याचं युवराज म्हणाला. तसंच जहीर खानने टूर्नामेंटमध्ये केलेली बोलिंग लाजवाब होती, अशी तारीफही त्याने केली.

वर्ल्डकपमधील स्वतच्या परफॉर्मन्सवरही युवराजने भाष्य केलं. मी देखील चांगल्या प्रकारे योगदान देऊन वर्ल्डकप विजयात खारीचा वाटा उचलला, असं युवराज म्हणाला.

युवराज सिंगचा दृष्ट लागेल असा खेळ…

2011 च्या वर्ल्डकप दरम्यान युवराज सिंग वेदनेने व्याकूळ होता. आपल्याला काहीतरी होतंय. हे त्याला जाणवत होतं. मात्र नक्की काय होतंय, हे कळण्यासाठी त्याला काही दिवस जाऊ द्यावे लागले. वर्ल्ड कपच्या संपूर्ण मॅचेस युवराजने लाजवाब खेळल्या. त्याने वर्ल्डकपमध्ये 362 धावा काढून 15 विकेट्सही मिळवल्या. त्याच्या बॅटिंग आणि बोलिंगने त्याने भल्या भल्यांना विचार करायला भाग पाडलं. या मॅचेस खेळत असताना त्याला एकदा रक्ताची उलटी झाली. मात्र त्यावेळी युवराजने तब्येतीवर लक्ष देण्याऐवजी वर्ल्डकपवर लक्ष देणं पसंत केलं.

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यापर्यंत तो जिगर लावून खेळला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरचा अंतिम सामना ज्यावेळी भारताने जिंकला त्यावेळी युवराजच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. त्याने केलेल्या कष्टाचं चीज झालं होतं. वर्ल्ड कप संपल्यानंतर त्याने ज्यावेळी वैद्यकीय चाचण्या केल्या त्यावेळी त्याला कॅन्सरचं निदान झाल्याचं समोर आलं. ज्या दिवशी त्याच्या हातात त्याचे वैद्यकीय रिपोर्टस आले त्यावेळी त्याच्या डोळ्यासमोरुन एखादी गाडी वेगात भुर्रकन निघून जावी तसा वर्ल्डकपचा संपूर्ण काळ सर्रकन निघून गेला. परंतु या काळात त्याने गाळलेल्या घामाची किंमत मोत्यांहून अधिक होती. त्याच्या घामाने भारताला वर्ल्ड जिंकता आला, याचं त्याला समाधान मिळालं. अनेकदा त्याने ही गोष्ट बोलून दाखवली तसंच भारतासाठी यादगार मॅचेस खेळता आल्या, ही माझ्यासाठी गर्वाची आणि समाधानाची गोष्ट असल्याचं तो म्हणतो.

(Yuvraj Singh Video 2011 Cricket World Cup And yuvi pray For Sachin tendulkar)

हे ही वाचा :

लोकलने जाणाऱ्या शार्दुल ठाकूरला भारदस्त गिफ्ट, आनंद महिंद्रांकडून Thar SUV पालघरच्या दारात उभी

भारदस्त कार भेट देणाऱ्या आनंद महिंद्रांना टी नटराजनकडून खास रिटर्न गिफ्ट

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.