Yuzvendra Chahal Networth : घटस्फोटानंतर धनश्रीला किती पोटगी मिळणार ?, युजवेंद्र चहलचे नेटवर्थ तर…
Yuzvendra Chahal Networth : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. दोघांनी घटस्फोटासाठी 5 फेब्रुवारीला अर्ज दाखल केला होता, त्यावर आज निर्णय होणार आहे.

टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा घटस्फोट घेणार असून त्यामुळेच ते चर्चेत आहेत. या हायप्रोफाईल घटस्फोटाचा निर्णय गुरुवारी,म्हणजेच आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात दिला जाणार आहे. या दोघांनी 5 फेब्रुवारी रोजी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. एका रिपोर्टनुसार, चहल हा धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देणार असल्याची चर्चा सुरू आहे. पण त्याच्यासाठी ही फार मोठी गोष्ट मानली जात नाही. त्यामागचे कारण म्हणजे त्याची कमाई, संपत्ती. चहलकडे किती संपत्ती आहे, जाणून घेऊया.
2020 ला लग्न, अवघ्या 5 वर्षांत घटस्फोट !
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. परस्पर संमतीने त्यांनी यासाठी मुंबई कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. दोघांनी 22 डिसेंबर 2020 रोजी लग्न केले, परंतु अवघ्या 5 वर्षांतच, 2025 मध्ये त्यांच्या घटस्फोटाची बातमी आली. विशेष बाब म्हणजे न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटर चहल आणि त्याची पत्नी धनश्री बऱ्याच काळापासून एकमेकांपासून वेगळे राहत आहेत.
चहल धनश्रीला किती पोटगी देणार ?
रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये ज्या मुद्यावर सहमती झाली त्यानुसार, युजवेंद्र चहल हा धनश्रीला पोटगी म्हणून 4.75 कोटी रुपये देणार आहे. कौटुंबिक न्यायालयात ही माहिती देण्यात आली आहे. तसेच चहलने यापूर्वीच धनश्रीला 2.37 कोटी रुपये दिल्याचे सांगण्यात आले आहे. आता चहलला उर्वरित रक्कम भरावी लागणार आहे.
इतक्या तासांतच पुन्हा करेल कमाई
युजवेंद्र चहल हाआयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळणार आहे. मेगा लिलावात पंजाब संघाने त्याला 18 कोटी रुपयांना विकत घेतले होते. म्हणजेच त्याला प्रत्येक सामन्यासाठी सरासरी 1.29 कोटी रुपये मिळतील. अशाप्रकारे तो घटस्फोटाची रक्कम केवळ 4 सामन्यांमध्ये पुन्हा कमवू शकेल. प्रत्येक सामना सुमारे 3 तास चालतो. असे पाहिले तर चहल फक्त 12 तास खेळून एवढे पैसे कमावेल. मात्र, या हंगामात त्याच्या पगाराची वेळ फ्रँचायझीवर अवलंबून आहे. अनेक वेळा स्पर्धा सुरू होताच खेळाडूला अर्धा पगार दिला जातो. तर उर्वरित पैसे स्पर्धेदरम्यान किंवा नंतर दिले जातात. त्यानुसार पाहिल्यास पहिला सामना खेळल्यानंतर त्याला नऊ कोटी रुपये मिळतील. अशाप्रकारे, घटस्फोटासाठी दिले जाणारे पैसे अवघ्या काही तासांत कमावण्याची चहलची क्षमता आहे. याशिवाय त्याला प्रत्येक सामन्यासाठी मॅच फी म्हणून 7.5 लाख रुपये वेगळे मिळतील. याचा अर्थ, जर त्याने ग्रुप स्टेज दरम्यान सर्व 14 सामने खेळले तर यामुळे चहलला 1.05 कोटी रुपये मिळतील, जे प्रत्येक सामन्यानंतर मिळतील.
चहलचे नेटवर्थ किती ?
आता युजवेंद्र चहलच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया, रिपोर्ट्सनुसार ती सुमारे 45 कोटी रुपये आहे. यामध्ये BCCIचे करार, इंडियन प्रीमियर लीग (IPL) तसेच ब्रँड एंडोर्समेंट आणि गुंतवणुकीतील उत्पन्नाचा समावेश आहे. युझवेंद्र चहल हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळासोबत ग्रेड सी करारात आहे आणि त्याला वार्षिक एक कोटी रुपये मिळतात. याशिवाय त्याला आयपीएलमध्ये खूप मागणी आहे. आयपीएल 2025 च्या मेगा-लिलावात पंजाब किंग्जने त्याला 18 कोटी रुपयांना विकत घेतले. आत्तापर्यंत, त्याच्या एकूण संपत्तीपैकी सुमारे 37 कोटी रुपये आयपीएलच्या माध्यमातून आले आहेत.
आलिशान घर, ब्रँड एंडोर्समेंटमधूनही कमाई
क्रिकेट व्यतिरिक्त, युझवेंद्र चहल हा जाहिरातींद्वारे देखील भरपूर कमाई करतो. तो VIVO, Nike, Acuvue, Boom 11 आणि Fanta सारख्या ब्रँडचे एंडोर्समेंट करतो. हरियाणातील गुरुग्राममध्ये त्याचे एक आलिशान घर आहे, याशिवाय त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या गाड्यांचा समावेश आहे.