Video : खोटं बोलणाऱ्या युजवेंद्र चहलची बायकोकडून पोलखोल, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. (Yuzvendra Chahal Wife Dhanashree verma Friend Trailer Video Goes Viral On Social Media)

Video : खोटं बोलणाऱ्या युजवेंद्र चहलची बायकोकडून पोलखोल, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 3:30 PM

मुंबई : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची बायको धनश्री वर्मा (Dhanashree Verma ) पाठीमागच्या काही दिवसांपासून अचडणीत सापडले होते. चहलच्या आई बाबांना कोरोनाची बाधा झाली होती तर धनश्रीच्या आई आणि भावाला देखील कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता दोघांच्याही कुटुंबातले सदस्य ठीक आहेत. घरातील सदस्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे युजवेंद्र आणि धनश्रीने सुटकेचा निश्वास सोडलाय. ते आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झालेत. याचीच झलक पाहायला मिळाली ती नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओतून…! (Yuzvendra Chahal Wife Dhanashree verma Friend Trailer Video Goes Viral On Social Media)

खोटं बोलणाऱ्या युजवेंद्रची बायकोकडून पोलखोल

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर युजवेंद्रसोबतचा एका व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती युजवेंद्रची फिरकी घेताना दिसून येत आहे. नुकताच अमेरिकन कॉमेडी शो Friends : The ReUnion हा ट्रेलर लाँच झालाय. चहलने या ट्रेलरचा व्हिडीओ शेअर केला होता. याच कारणाने धनश्रीने त्याची चांगलीच पोलखोल केली.

व्हिडीओमध्ये धनश्री सांगत आहे की, चहलने फ्रेंडसचा एकही एपिसोड पाहिला नाही. तरीही तो त्याची स्टोरी टाकतोय, अशा प्रकारे धनश्रीने त्याची पोलखोल केलीय, तर युजवेंद्रने धनश्रीचा मुद्दा खोडताना ‘मी पूर्ण एपिसोड पाहिल्याचं’ सांगत आहे.

यानंतर या शोबद्दल धनश्री युजवेंद्रला प्रश्न विचारते. ज्याचीउत्तर देण्यास चहलला अडचणी आल्या. धनश्री आणि चहलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे.

कोण आहे चहलची बायको धनश्री वर्मा?

युजवेंद्र चहलची जोडीदार धनश्री वर्मा व्यवसायाने डेंटिस्ट, कोरिओग्राफर आणि यूट्यूबर आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने मोठा काळ एकमेकांसोबत घालवलेला आहे. त्यानंतर दोघं विवाहबंधनात अडकलेत.

धनश्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

धनश्री अधून मधून आपल्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांना कमालीचे आवडतात. तिचा नुकताच भांगडा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तसंच भारतीय संघाचा खेळाडू श्रेयस अय्यरसोबतचा डान्सचा व्हिडीओ तुफान लोकप्रिय झाला होता.

(Yuzvendra Chahal Wife Dhanashree verma Friend Trailer Video Goes Viral On Social Media)

हे ही वाचा :

Photo : सौदी अरेबियाची मॉडेल ते इरफान पठाणची बायको, पहा किती झाला बदल?

इंग्लंडला टेकऑफ करण्यापूर्वी टीम इंडिया मुंबईत, PPE घातलेला विराटचा हुकमी एक्का कोण? ओळखा…!

IPL च्या उरलेल्या 31 मॅचचं वेळापत्रक तयार, 29 तारखेला BCCI मोठी घोषणा करणार?

दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.