ODI World Cup 2023 | क्वालिफायर सामन्यांच्या यजमानपदाचा मान ‘या’ देशाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अर्थात आयसीसीने कोविड-19 मुळे नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
हरारे : 2023 मध्ये 50 षटकांच्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचं (ODI World Cup 2023) आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलं आहे. 2011 नंतर टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. दरम्यान या 2023 च्या या वर्ल्ड कप स्पर्धेतील क्वालिफायर सामन्यांचा (पात्रता फेरी) मान झिंबाब्वेला मिळाला आहे. म्हणजेच या स्पर्धेतील क्वालिफायर सामने हे झिंबाब्वेमध्ये (Zimbabwe) खेळण्यात येणार आहेत. Zimbabwe to host 2023 ODI World Cup qualifiers in India
आयसीसीने कोविड 19 मुळे नवं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या नव्या वेळापत्रकानुसार हे क्वालिफायर सामने 18 जून ते 9 जुलै 2023 दरम्यान खेळण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आणि इतर टॉप 7 टीम या वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरले आहेत. तर सुपर लीगमधील उर्वरित 5 संघ या वर्ल्ड कपमध्ये क्वालिफायर सामने खेळतील. यामध्ये सर्वोत्तम 2 किंवा 3 संघही खेळतील.
ख्रिस टेटली हे या आयसीसी स्पर्धेचे प्रमुख आहेत. “जेव्हा आम्ही ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप 2023 आयोजित करण्याचे ठरविले तेव्हा आम्हाला पात्रता स्पर्धा आयोजित करण्यासाठीही वेळ मिळाला”, असं टेटली यांनी सांगितलं.
“आम्ही 96 वन डे आणि 60 लिस्ट ए सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी आमच्या सदस्यांसह भागीदारांना विश्वासात घेतलं आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. तसेच यासह आयसीसीने वर्ल्ड लीग-2 आणि चॅलेंज लीग स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केली आहे”, अशी माहिती टेटली यांनी दिली.
दरम्यान या 50 षटकांच्या वर्ल्ड कप स्पर्धेआधी पुढील वर्षात म्हणजेच 2021 मध्ये टी 20 वर्ल्ड स्पर्धा खेळण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. नियोजित वेळापत्रकानुसार ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 दरम्यान ही स्पर्धा खेळण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या :
Australia vs India, 1st Test | विराटचं टॉस जिंकणं टीम इंडियासाठी विजयाचे संकेत, पाहा आकडेवारी
Dream 11 वर फेव्हरेट टीम कशी निवडतात, पैसे कसे कमवायचे? जाणून घ्या एका क्लिकवर
Zimbabwe to host 2023 ODI World Cup qualifiers in India