ZIM vs NED : झिम्बाब्वेने नेदरलँड्सविरुद्ध टॉस जिंकला, झिम्बाब्वेसाठी आजची मॅच महत्त्वाची
झिम्बाब्वेच्या टीमने पाकिस्तानच्या टीमचा पराभव केल्यापासून त्याचं चाहत्यांकडून अधिक कौतुक केलं जात आहे.
मेलबर्न : झिम्बाब्वे (Zimbabwe) नेदरलँड्स (Netherlands) यांच्यातला महामुकाबला थो़ड्याच वेळात सुरु होणार आहे. आजच्या मॅचमध्ये टॉस जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup) झिम्बाब्वे टीमने चांगली खेळी केली आहे. त्यामुळे झिम्बाब्वे टीम सेमीफायनलच्या उंबरठ्यावर आहे. आजच्या मॅचमध्ये झिम्बाब्वे टीमला विजय गरजेचा आहे.
सध्या झिम्बाब्वे टीमकडे तीन पॉईंट आहेत, समजा आजच्या मॅचमध्ये नेदरलँड्स टीमचा झिम्बाब्वेच्या टीमने पराभव केल्यास त्यांच्या गटामध्ये आफ्रिका टीमच्या नंतर त्याचा नंबर लागू शकतो. कारण आफ्रिका टीम सध्या नंबर एकवरती आहे.
झिम्बाब्वेच्या टीमने पाकिस्तानच्या टीमचा पराभव केल्यापासून त्याचं चाहत्यांकडून अधिक कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्ध ज्यावेळी टीमचा विजय झाला. त्यावेळी त्यांच्या पंतप्रधानांनी पाकिस्तान टीमची खिल्ली उडविली होती.
झिम्बाब्वे टीम
क्रेग इर्विन, रायन बुर्ले, रेगिस चकाबवा, तेंडाई चटारा, ब्रॅडली इव्हान्स, ल्यूक जोंगवे, क्लाइव्ह मदांडे, वेस्ली माधेवेरे, वेलिंग्टन मसाकादझा, टोनी मुन्योंगा, ब्लेसिंग मुजराबानी, रिचर्ड शुराबानी, विल्यम्स शुराबानी, विल्यम्स, रिचर्ड.
नेदरलँड्स टीम
स्कॉट एडवर्ड्स, कॉलिन अकरमन, शरीझ अहमद, लोगन व्हॅन बीक, टॉम कूपर, ब्रँडन ग्लोव्हर, टिम व्हॅन डर गुगेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पॉल व्हॅन मीकरेन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, स्टेफन मायगुरमनबर्ग, तेजा निदा , मॅक्स ओ’डॉड, टिम प्रिंगल, विक्रम सिंग.