Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती

भारतात फोन पे, गुगल पे, पेटीएमसारख्या युपीआय आधारित अॅप्सचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती
Follow us
| Updated on: Nov 06, 2020 | 12:13 PM

मुंबई : भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) आधारित व्यहारांचे प्रमाण वाढलं आहे. फोन पे (PhonePe), गुगल पे (Google Pay), पेटीएमसारख्या (Paytm) युपीआय आधारित अॅप्सचा देशात मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यांना टक्कर देण्यासाठी आता व्हॉट्सअॅप मैदानात उतरलं आहे. व्हॉट्सअॅपवरुन (Whatsapp) आता पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. नुकतीच व्हॉट्सअ‍ॅपला भारतात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआय (UPI) आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. (How to transfer money from Whatsapp Pay?)

व्हॉट्सअॅपने जून महिन्यामध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सुरु केली आहे. तसेच काही व्हॉट्सअॅप युजर्ससाठी ही सेवा उपलब्ध होती. याद्वारे कंपनीने त्यांची पेमेंट सेवा गेल्या काही महिन्यात तपासून पाहिली. लवकरच ही सेवा सर्वांना मिळणार आहे. NPCI ने सध्या काही मोजक्या मोबाईल क्रमांकासाठी व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. लवकरच ही मर्यादा वाढवली जाणार आहे. NPCI कडून “WhatsApp पेमेंट सिस्टिमसाठी Go Live ची परवानगी देण्यात आली आहे.

भारतात WhatsApp चे 400 मिलियनपेक्षा (40 कोटी) अधिक युजर्स आहेत. सुरुवातीला त्यापैकी केवळ 20 मिलियन युजर्सना (दोन कोटी ग्राहक) व्हॉट्सअॅपची पेमेंट सुविधा वापरता येईल. तसेच काही कालावाधीत ही मर्यादा वाढवली जाईल आणि लवकरच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? (तुमचं व्हॉट्स्ॅप अद्याप अपडेट झालेलं नसेल तर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन दिसणार नाही.)

Step 1. Whatsapp ओपन केल्यानंतर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या 3 डॉट्स वर क्लिक करा. Step 2. तिथे असलेल्या Settings section वर क्लिक करा Step 3. Settings ओपन केल्यावर Payments चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा Step 4. त्यानंतर Whatsapp तुम्हाला Bank Account link करण्यास सांगेल. (तेच अकाऊंट लिंक करा ज्या अकाऊंटशी लिंक्ड सिमकार्ड तुमच्या मोबाईलमध्ये अॅक्टिव्हेट असेल, तसेच तुमचं व्हॉट्सअॅप अकाऊंट त्याच नंबरशी लिंक्ड असेल.) Step 5. Bank Account link करताना Whatsapp तुम्हाला काही नियम आणि अटींवर (Terms & Conditions) Agree करण्यास सांगेल. तुम्ही I agree बटणावर क्लिक करु शकता अथवा मागच्या मेनू मध्ये जाऊ शकता. Step 6. Terms & Conditions स्वीकारल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर Verify करावा लागेल. इथून पुढे यूपीआय (UPI) व्हेरिफिकेशनला सुरुवात होईल.

Step 7. मोबाईल नंबर व्हेरिफाय केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर तुम्हाला विविध बँकांच्या नावांची यादी दिसेल. त्यापैकी तुम्हाला तुमची बँक निवडायची आहे. Step 8. त्यानंतर व्हॉट्सअॅप तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payee Address बनवण्यास सांगेल, तुम्ही त्यावर क्लिक करा, VPA तयार होईल. Step 9. व्हॉट्सअॅप तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डवरील शेवटचे सहा अंक विचारेल. तसेच इतरही काही माहितीची मागणी केली जाईल (डेबिट कार्डवरील एक्सपयरी डेट, तुमची जन्मतारीख इत्यादी) Step 10. त्यानंतर तुम्ही व्हॉट्सअॅपवरील मनी ट्रान्सफर हे फिचर वापरु शकता.

संबंधित बातम्या

Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर करा; भारतात UPI आधारित पेमेंट सेवा सुरू करण्याची परवानगी

WhatsApp चं नवं फीचर, स्टोरेज कमी करणं आणि फाईल्स डिलीट करणं आणखी सोपं

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

How to transfer money from Whatsapp Pay; Check step by step information

'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट
'मुंडे खोटारडा माणूस, दर दिवशी नवीन बायका..' करूणा शर्मांचा गौप्यस्फोट.
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं
मोस्ट वॉन्टेड तहव्वूर राणाला अखेर भारतात आणलं.