हफ्त्यावर घेतलेलं वाहन विकायचं असेल तर काय कराल?

नवी गाडी खरेदी केल्यानंतर काहींना तिचा रंग किंवा मॉडेल आवडत नाही. त्यामुळे ते ती गाडी  विकण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही ही गाडी वाहन कर्ज काढून घेतली असेल, तर मात्र ती विकण्यासाठी तुम्हाला फार त्रास सहन करावा लागतो.

हफ्त्यावर घेतलेलं वाहन विकायचं असेल तर काय कराल?
Follow us
| Updated on: Jul 25, 2019 | 6:31 PM

मुंबई : नवी गाडी खरेदी केल्यानंतर काहींना तिचा रंग किंवा मॉडेल आवडत नाही. त्यामुळे अनेकजण ती गाडी  विकण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्ही ही गाडी वाहन कर्ज काढून घेतली असेल, तर मात्र ती विकण्यासाठी तुम्हाला फार त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकजण यात कर्जावर घेतलेली गाडी खरेदी किंवा विकण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. पण जर तुम्हाला खरंच कर्ज काढून घेतलेली गाडी विकायची असेल, तर बँका तुमच्यासमोर काही पर्याय देते. पण अनेकांना हे पर्याय माहित नसतात. त्यामुळे त्यांना नाहक त्रासाचा सामना करावा लागतो.

योग्य व्यक्तीची निवड

जर तुम्ही गाडी कर्जावर घेतलेली असेल, तर ते कर्ज इतरांच्या नावे ट्रान्सफर करता येते. मात्र यात तुम्ही गाडी दाखवणे, पैसे घेतले, विक्रीनामा, आरसी ट्रान्सफरसह इतर कागदपत्रांवर सही घेतली म्हणजे तुमची गाडी विकली गेली असे नाही. तर गाडीची विक्री करण्यासाठी तुम्हाला विश्वासू आणि योग्य व्यक्तीची निवड करणे गरजेचे आहे. त्यासोबतच रजिस्ट्रेशन आणि इन्शुअरन्सही तुम्हाला गाडी खरेदी करणाऱ्याच्या नावे ट्रान्सफर करावे लागते.

कर्ज ट्रान्सफर करणे पडू शकते महागात

गाडी विकणाऱ्या व्यक्तीला कर्जाचे ट्रान्सफर, बँकेची प्रोसेसिंग फी, कार रजिस्ट्रेशन आणि कार इन्शुअरन्स ट्रान्सफर यांसारखे अनेक खर्च द्यावे लागतात. या खर्चांमुळे कर्ज ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया फार खर्चिक होते. त्यामुळे हा खर्च गाडी विक्रेता आणि खरेदी करण्यामध्ये विभागला जातो.

कागदपत्र तपासणे

दुसऱ्या व्यक्तीला गाडीचे कर्ज ट्रान्सफर करण्यापूर्वी कर्जाचे सर्व कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्या. कर्जाच्या अनेक कागदपत्रांवर तुम्ही कोणत्या व्यक्तीला कर्ज ट्रान्सफर करु शकता, याबाबतची माहिती दिलेली असते. जर तुम्हाला या कागदपत्रांवर अशाप्रकारची माहिती मिळाली नाही, तर तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकांशी संपर्क करुन माहिती घेऊ शकता. त्यासोबत याबाबतची अटी, नियम यांचीही माहिती एकदा बँकेतील कर्मचाऱ्यांना विचारण्यास विसरु नका.

क्रेडिट हिस्ट्री

लिसी मंत्रा या कंपनीचे सीईओ अंशुल आनंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी विक्रेत्या व्यक्तीने सर्वप्रथम गाडी खरेदी करणाऱ्या माणसाचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यावा. त्यासोबतच त्याची क्रेडिट हिस्ट्रीही पाहावी. तसेच तो व्यक्ती वाहन कर्ज ट्रान्सफर करण्यासाठी योग्य आहे का याचीही पडताळणी करणे गरजेचे आहे. गाडी खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न, राहण्याचा पत्ता यासारख्या सर्व गोष्टींची माहितीही करुन घेणे आवश्यक आहे. तसेच तुम्ही ज्या व्यक्तीला गाडी विकत आहात, बँक सर्वप्रथम त्याचे क्रेडीट मुल्यांकन करते. त्यानुसार तो व्यक्ती खरंच कर्जाची परतफेड करु शकतो का याचीही चौकशी केली जाते. या सर्वांची खात्री पटल्यानंतर गाडीच्या विक्रेत्याला गाडी विकण्यासाठी बँक परवानगी देते.

आरसी ट्रान्सफर करण्यास विसरु नका

कर्ज ट्रान्सफर करण्यासोबतच विक्रेत्याने आरसी ट्रान्सफर करण्यास विसरु नये. त्यासाठी तुम्ही एकदा आरटीओ ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करुन ही सर्व प्रक्रिया समजून घ्या. आरटीओमध्ये कार ट्रान्सफर प्रक्रियेसाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जातात. कर्ज असणाऱ्या बँकांकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरसी बूकवर नव्या मालकाचे नाव रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर दिले जाते.

मोटार इन्शुअरन्स पॉलिसी

आरसी ट्रान्सफर केल्यानंतर मोटर इन्शुअरन्स पॉलिसीही आपोआप नवीन खरेदी करण्याच्या नावे ट्रान्सफर केली जाते. यामुळे नवीन मालकाला येणाऱ्या महिन्यातील हफ्ते फेडण्यास कोणताही त्रास होत नाही.

जर तुम्ही वापरलेली कार खरेदी करत असाल, तर

जर तुम्ही वापरलेली कार खरेदी करत असाल तर तुम्हाला युज्ड वाहन कर्जासाठी अर्ज करावा लागतो. पण बँका नवीन गाडीच्या तुलनेत जुन्या गाडीवर जादा व्याज आकारतात. अनेक बँका फक्त 5 वर्षांपर्यंतच्या वापरलेल्या गाड्यांवर कर्ज देतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.