चीनला पुन्हा दणका, आणखी 47 चिनी अ‍ॅपवर बंदी, आता PUBG आणि AliExpress चा नंबर?

भारताने पुन्हा एकदा 47 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला (Chinese App ban in India) आहे.

चीनला पुन्हा दणका, आणखी 47 चिनी अ‍ॅपवर बंदी, आता PUBG आणि AliExpress चा नंबर?
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 1:09 PM

मुंबई : भारताने पुन्हा एकदा 47 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला (Chinese App ban in India) आहे. हे 47 अ‍ॅप काहीदिवसांपूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅपचा क्लोनप्रमाणे काम करत होते. भारताने यापूर्वी 59 चिनी अ‍ॅप बॅन केले ज्यामध्ये काही प्रसिद्ध अ‍ॅपही होते. त्यानंतर आता पब्जी आणि अली एक्सप्रेसचाही नंबर लागणार असल्याचे एका अहवालात म्हटले आहे (Chinese App ban in India).

यापूर्वी बंदी घातलेल्या अ‍ॅपमध्ये टिक टॉक, वी चॅट, अली बाबा यूसी न्यूज आणि यूसी ब्राऊझरचाही समावेश होता. 250 असे चिनी अ‍ॅप आहेत ज्यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे यांची चौकशीही केली जाऊ शकते.

चिनी अ‍ॅप बॅन करण्यासाठी एक नवीन यादी तयार केली जात आहे आणि यामध्ये काही टॉप गेमिंग अ‍ॅप्सचाही समावेश आहे. त्यामुळे लवकरच भारतात प्रसिद्ध झालेले काही चिनी गेम्सवरही बंदी घातली जाऊ शकते.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी 200 पेक्षा अधिक अ‍ॅपची यादी तयार केली जात आहे. ज्यामध्ये पब्जी आणि अली एक्सप्रेससारखे प्रसिद्ध अ‍ॅप आहेत. भारतात या अ‍ॅप्सचे कोटींमध्ये युझर्स आहेत.

हे चिनी अ‍ॅप भारतातील डेटा चीनसोबत शेअर करत आहेत आणि त्यामुळे सरकारी ऐजन्सीकडून या अ‍ॅपचे रिव्ह्यू केले जात आहे. सध्या सरकारकडून नवीन अ‍ॅपवर बंदी घालण्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

दरम्यान, पब्जी अ‍ॅपचेही चीनसोबत संबंध आहे. पण हे अ‍ॅप पूर्णपणे चिनी अ‍ॅप म्हणू शकत नाही. त्यामुळे पब्जी अ‍ॅपवर बंदी घालणार का, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या :

Chinese Apps | निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी अंमलबजावणी, Tik Tok, Helo सह 59 चिनी अ‍ॅप अखेर बंद

TikTok App: टिकटॉकच्या अजब गोष्टी, एक फेल अ‍ॅप यूट्यूबचा प्रेक्षक खेचणारं एकमेव अ‍ॅप कसं झालं?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.