10 हजारांपेक्षा कमी किमतीत 6 GB रॅमसह 4 कॅमेरांचा स्मार्टफोन
तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत 4 कॅमेरा असलेला फोन मिळणार असेल, तर कुणालाही आवडेल. असाच एक फोन इंफिनिक्सने (Infinix) भारतात लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव Hot 7 Pro असे आहे.
नवी दिल्ली : तुम्हाला 10 हजार रुपयांपेक्षाही कमी किमतीत 4 कॅमेरा असलेला फोन मिळणार असेल, तर कुणालाही आवडेल. असाच एक फोन इंफिनिक्सने (Infinix) भारतात लाँच केला आहे. या नव्या स्मार्टफोनचे नाव Hot 7 Pro असे आहे.
10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 6 GB ची रॅम येणारा Infinix Hot 7 Pro हा पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. इंफिनिक्स Hot 7 Pro मध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच डिझाईनसोबत HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनच्या फ्रंट आणि बॅकला ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट आणि बॅकला 2-2 कॅमेरा दिल्याने या फोनमध्ये एकूण कॅमेरांची संख्या 4 आहे. भारतीय बाजाराचा विचार करता या स्मार्टफोनचा थेट मुकाबला शाओमीच्या रेडमी 7 आणि सॅमसंग गॅलेक्सी M20 स्मार्टफोनशी होणार आहे. या स्मार्टफोनमध्ये दुसरे महत्त्वाचे फिचर म्हणजे त्याची 4,000 mAh ची बॅटरी आणि AI पॉवर्ड कॅमरा फिचर. फोनमध्ये मेटल युनीबॉडी डिझाईन आहे. इंफिनिक्सचा हा स्मार्टफोन 17 जूनपासून फ्लिपकार्डवर विक्रिसाठी उपलब्ध असेल.
किंमत आणि लाँच ऑफर
इंफिनिक्स Hot 7 Pro ची किंमत 9,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजच्या वेरिअंटमध्ये येईल. हा फोन मिडनाईट ब्लॅक आणि अॅक्वा ब्लू कलर अशा पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. फ्लिपकार्टचा सेल 17 जूनपासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोनवर एक खास ऑफरही मिळणार आहे. ‘स्पेशल लाँच ऑफर डिस्काउंट’सह 21 जूनपर्यंत हा फोन खरेदीवर 1,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे हा स्मार्टफोन तुम्हाला केवळ 8,999 रुपयांमध्ये मिळेल.
इंफिनिक्स Hot 7 Pro चे काही खास फिचर
या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल सिमची (नॅनो) व्यवस्था करण्यात आली असून अँड्रॉईड 9.0 पाय आधारीत XOS 5.0 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 6.19 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 2.5D ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तसेच ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो P22 प्रोसेसर असल्याने या फोनचा परफॉर्मन्सही अधिक चांगला असेल. फोनच्या बॅकला 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आहे. रिअर कॅमेरा सेटअप 8 सीन मोड्ससोबत ऑटो सीन डिटेक्शनला सपॉर्ट करतो.