पहिल्याच सेलमध्ये आऊट ऑफ स्टॉक, Micromax चा मेड इन इंडिया फोन म्हणतो ‘मी पुन्हा येईन!’
मायक्रोमॅक्सने नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सना ग्राहकांची चांगलीच पसंती मिळत आहे.
मुंबई : मायक्रोमॅक्सने (Micromax) नुकतेच त्यांच्या In-सिरीजमधील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. Micromax IN Note 1 आणि Micromax In 1b अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. यापैकी Micromax IN Note 1 हा स्मार्टफोन 24 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. तर Micromax In 1b हा स्मार्टफोन आजपासून विक्रीस उपलब्ध केला जाणार आहे. यापैकी मायक्रोमॅक्स इन नोट 1 ला देशभरातील ग्राहकांची चांगलीच पसंती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या स्मार्टफोनची देशात इतकी मागणी वाढली आहे की, पहिल्याच सेलमध्ये अवघ्या एक दिवसात हा स्मार्टफोन आऊट ऑफ स्टॉक (Out Of Stock) झाला आहे. (Micromax In note 1 sale on 1st december at 12 noon, check price-and-specification)
हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाल्यामुळे तुम्हाला खरेदी करता आला नसेल तर निराश होऊ नका. हा स्मार्टफोन 1 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच या फोनमध्ये दोन वर्षांचा सॉफ्टवेअर अपडेटदेखील मिळेल. मायक्रोमॅक्सने ट्विटरवरुन या फोनच्या सेलबाबतची माहिती दिली आहे. मायक्रोमॅक्सचे दोन्ही स्मार्टफोन्स ग्राहक ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि मायक्रोमॅक्सइन्फो.कॉमवरील (micromaxinfo.com) फ्लॅश सेलद्वारे खरेदी करु शकतात. 1 डिसेंबरला हा फोन पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
Micromax In Note 1 चे स्पेसिफिकेशन्स
या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. यात स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हीलियो G85T (MediaTek Helio G85T) प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज (इंटर्नल मेमरी) स्पेस देण्यात आली आहे. तसेच 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबत 5 आणि दोन मेगापिक्सलचे अजून दोन कॅमेरे आहेत. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे.
Micromax In 1B चे स्पेसिफिकेशन्स
Micromax In 1B मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच MediaTek चा Helio G35 प्रोसेसर देण्यात आला आहे. 13 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेकंडरी कॅमेरा हा दोन मेगापिक्सलचा आहे. तसेच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAH क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
…म्हणून मायक्रोमॅक्सला पसंती?
भारत आणि चीनच्या सीमेवरील तणावामुळे एका बाजूला देशात सातत्याने boycott china, boycott chinese products चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला देशात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. भारतीय मार्केटमध्ये चांगले मेड इन इंडिया स्मार्टफोन उपलब्ध नसल्याने चिनी कंपन्यांची देशात मोठी उलाढाल सुरु आहे, असे बोलले जाते. चीनच्या सीमेवरील कुरापतींमुळे देशात चीनविरोधी वातावरण निर्माण झालेलं असताना मायक्रोमॅक्स या भारतीय स्मार्टफोन कंपनीने मार्केटमध्ये पुनरागमन केलं, त्याचा मायक्रोमॅक्सला फायदा झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.
संबंधित बातम्या
256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर
48MP कॅमेरा, 128 GB स्टोरेज आणि डुअल स्क्रीन असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर 5000 रुपयांचा डिस्काऊंट
Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स
(Micromax In note 1 sale on 1st december at 12 noon, check price-and-specification)