OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, ‘हे’ आहेत खास फीचर्स

स्मार्टफोन्स बनवणारी चीनी कंपनी OnePlus आता स्मार्ट टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला पहिला टीव्ही पुढील महिन्यात लाँच करु शकते.

OnePlus TV चे स्पेसिफिकेशन्स लीक, 'हे' आहेत खास फीचर्स
Follow us
| Updated on: Aug 25, 2019 | 5:51 PM

मुंबई : प्रिमिअम स्मार्टफोन्स बनवणारी चीनी कंपनी OnePlus आता स्मार्ट टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. कंपनी आपला पहिला टीव्ही पुढील महिन्यात लाँच करु शकते. गेल्या काही महिन्यांपासून OnePlus TV ची खूप चर्चा आहे. कंपनी या नव्या टीव्हीमध्ये स्मार्टफोन्स प्रमाणेच जबरदस्त फीचर देऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. OnePlus च्या या नव्या टीव्हीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी या अगोदरही पुढे आल्या आहेत. त्यानंतर आता या टीव्हीची एक डिटेल्ड स्पेसिफिकेशन्स शीट लीक झाली आहे.

कोडनेम ‘Dosa’

लीक झालेल्या शीटचा फोटो हा गूगल प्ले डेव्हलपर कंसोल पेजचा स्क्रिनशॉट असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये टीव्हीच्या खास स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. लीक झालेल्या फोटोनुसार, OnePlus च्या या टीव्हीचं कोडनेम ‘Dosa’ आहे. ज्या खास फिचर्ससोबत OnePlus टीव्ही भारतात लाँच होणार होता, त्या सर्व स्पेसिफिकेशन्सची माहिती या लीक शीटमध्ये आहे.

टीव्हीमध्ये मीडियाटेक प्रोसेसर

OnePlus टीव्हीमध्ये 2560 MB रॅमसोबतच मीडियाटेक MT5670 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा एक क्वॉड-कोअर प्रोसेसर आहे, जो 1.5Ghz वर काम करतो. या चिपसेटमध्ये ARM Mali G51 GPU देण्यात आला आहे. टीव्हीचं रिझॉल्युशन 1920×1080 इतकं असेल. सूत्रांनुसार, OnePlus टीव्हीचा मेन्यू 1080 पिक्सल असेल. OnePlus टीव्ही ही 4K पॅनलसोबत येईल अशी माहिती काहीच दिवसांपूर्वी कंपनीने दिली होतं.

अँड्रॉईड 9 पाय बेस्ड ओएस

ऑपरेटिंग सिस्टम बाबत सांगायचं झालं तर OnePlus टीव्ही हा अँड्रॉईड 9 पायवर काम करेल. कंपनी याला ओएससोबत कस्टमाईजही करेल. त्यामुळे OnePlus टीव्ही हा त्या UI टीव्हींपेक्षा वेगळा असेल जे स्टॉक अँड्रॉईड टीव्ही 9 वर काम करतात.

भारतात कधी लाँच होणार?

OnePlus टीव्ही हा 55 इंचाच्या QLED डिस्प्लेसोबत येईल. कंपनी हा टीव्ही पहिल्यांदा भारतातच लाँच करणार आहे. पुढील महिन्यात कंपनी हा टीव्ही लाँच करु शकते. त्यानंतर हा टीव्ही युरोप आणि अमेरिकेत लाँच होईल. तर चीनमध्ये येत्या ऑक्टोबरला हा टीव्ही लाँच होईल.

संबंधित बातम्या : 

पुढच्या वर्षी नोकियाचा स्वस्त 5G फोन लाँच होणार

आता फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूबलाही आधार कार्ड लिंक होणार?

Samsung Galaxy Note 10 आणि Galaxy Note 10+ भारतात लाँच, किंमत किती

WhatsApp चे 5 नवे फीचर लाँच, चॅटिंग करणे सोपं होणार

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.