Paytm Mini App store | थेट गुगलला आव्हान, पेटीएमचे नवे ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ लाँच!

फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ने (Patytm) थेट गुगलला आव्हान देत, आपले ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ (Mini App Store) लाँच केले आहे.

Paytm Mini App store | थेट गुगलला आव्हान, पेटीएमचे नवे ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ लाँच!
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 2:59 PM

मुंबई : फायनान्शियल सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म ‘पेटीएम’ने (Patytm) थेट गुगलला आव्हान देत, आपले ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ (Mini App Store) लाँच केले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला ‘पेटीएम’ अ‍ॅपला पॉलिसी उल्लंघनाचे कारण देत काही काळासाठी गुगल प्लेस्टोअरमधून हटवण्यात आले होते. आता पेटीएम त्यांच्या ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’द्वारे (Paytm Mini App Store) गुगल प्ले स्टोअरशी स्पर्धा करण्याची तयारी करत आहे. अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांना गुगल व्यतिरिक्त आणखी एक पर्यायही उपलब्ध झाला आहे (Paytm Launched its own mini app store).

पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विजय शेखर शर्मा यांनीही ट्विट करत ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’ची माहिती दिली आहे. पेटीएमच्या वापरकर्त्यांची संख्या मोठी असल्याने अ‍ॅप डेव्हलपर आणि ब्रँड्सनाही मिनी अ‍ॅप स्टोअरचा फायदा होणार आहे. पेटीएम वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अ‍ॅपच्या 150 दशलक्ष सक्रिय वापरकर्त्यांना ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’चा वापर करता येणार आहे.

‘पेटीएम मिनी अ‍ॅप स्टोअर’ची सुरुवात!

पेटीएमच्या ‘मिनी अ‍ॅप स्टोअर’मध्ये आतापर्यंत ‘1 एमजी’, ‘नेटमेड्स’, ‘डीकॅथलॉन’सारखे अ‍ॅप्स दाखल झाले आहेत. डेव्हलपर्स या प्लॅटफॉर्मवर पेटीएम (Paytm) वॉलेट आणि यूपीआयच्या माध्यमातून शून्य टक्के पेमेंट चार्जवर अ‍ॅप्सचे वितरण करू शकतात. मिनी अ‍ॅप स्टोअरमध्ये अ‍ॅनालिटिक्ससाठी डेव्हलपर डॅशबोर्ड आणि विपणन साधनांसह पेमेंट कलेक्शन पर्याय देण्यात आला आहे. (Paytm Launched its own mini app store)

यापूर्वी पेटीएमने यूपीआय, कॅश आणि स्क्रॅच कार्डद्वारे क्रिकेट लीग देखील सुरू केली होती. पेटीएम वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेट स्टार्सच्या बदल्यात स्टिकर्स मिळू शकतात आणि त्याद्वारे मिळणाऱ्या कॅशबॅकमधून  रिचार्ज, किराणा खरेदी आणि  मोबाइल बिल भरता येऊ शकते.

पेटीएमचे गुगलवर आरोप

‘गुगल अँड्रॉइड प्ले स्टोअर’वर पुन्हा परतण्यासाठी यूपीआय कॅशबॅक आणि स्क्रॅच कार्ड स्कीम काढून टाकण्यासाठीच्या गुगलच्या आदेशाचे पालन करण्यास भाग पडल्याचा, आरोप पेटीएमने केला आहे. या दोन्ही ऑफर भारतात कायदेशीर असून, सरकारने ठरविलेल्या सर्व नियम व कायद्यांनुसार कॅशबॅक देण्यात येत होता. गुगलची पेमेंट सर्व्हिस ‘गुगल पे क्रिकेट’वरही अशीच ऑफर देण्यात येत असल्याचा मुद्दा देखील त्यांनी अधोरेखित केला. गुगलच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तत्पर असून, आम्ही नेहमीच त्यांच्या सूचनांचे पालन केले आहे, असे स्पष्टीकरण पेटीएमने (Paytm) दिले आहे.

(Paytm Launched its own mini app store)

संबंधित बातम्या : 

चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी, Paytm चे संस्थापक विजय शेखर शर्मा म्हणतात…

PAYTM | पेटीएम युजर्सना धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.