Realme 3 स्मार्टफोनचा भारतात हटके रेकॉर्ड

नवी दिल्ली : ऑनलाईन मार्केटमध्ये Realme 3 या स्मार्टफोनची क्रेझ सध्या तरुण वर्गामध्ये वाढत आहे. Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 या MI कंपनीच्या स्मार्टफोनला मागे टाकत Realme 3 हा स्मार्टफोन ऑनलाईन मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. काऊंटर पॉईंट (Counterpoint) या रिसर्च बेस्ड कंपनीने मार्च 2019 मधील ऑनलाईन मार्केटद्वारे विकणाऱ्या स्मार्टफोनची आकडेवारी जाहीर […]

Realme 3 स्मार्टफोनचा भारतात हटके रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नवी दिल्ली : ऑनलाईन मार्केटमध्ये Realme 3 या स्मार्टफोनची क्रेझ सध्या तरुण वर्गामध्ये वाढत आहे. Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7 या MI कंपनीच्या स्मार्टफोनला मागे टाकत Realme 3 हा स्मार्टफोन ऑनलाईन मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन ठरला आहे. काऊंटर पॉईंट (Counterpoint) या रिसर्च बेस्ड कंपनीने मार्च 2019 मधील ऑनलाईन मार्केटद्वारे विकणाऱ्या स्मार्टफोनची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार Realme 3 या स्मार्टफोनची मार्च 2019 मध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे.

Realme 3 हा स्मार्टफोन गेल्यावर्षी 1 मे रोजी भारतात लाँच करण्यात आला. त्यानंतर Realme कंपनीद्वारे Realme 1, Realme 2, Realme 3, Realme 2 Pro, Realme 3 Pro, Realme U1, Realme C1, आणि Realme C2, हे स्मार्टफोन भारतात लाँच केले आहेत.

काऊंटर पॉईंट या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, Realme ही स्मार्टफोन कंपनी बदलत्या ट्रेंडनुसार विविध स्पेसिफिकेशन, नवनवीन फीचरचा स्मार्टफोनमध्ये नेहमीच समावेश करत असते. त्यामुळे Realme या स्मार्टफोनला भारतातील तरुणांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. नुकतंच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो या दोन्ही फोनची 10.2 टक्के विक्री झाली आहे. तर Realme या स्मार्टफोनची 10.4 टक्के विक्री झाली आहे.

काऊंटर पाँईंटने जाहीर केलेल्या या आकडेवारीचे आम्ही खूप आभारी आहोत. Realme कंपनीने Realme 3 या फोनचे अवघ्या तीन आठवड्यात 5 लाख स्मार्टफोनची विक्री केली होती. त्यानुसार काऊंटर पाँईंटने दिलेल्या आकडेवारीनुसार आम्ही भारतातील ऑनलाईन मार्केटमध्ये पहिल्या क्रमांकाचा स्मार्टफोन बनला आहे. याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे की, Realme 3 या स्मार्टफोनला भारतात अशाप्रकारे सपोर्ट मिळेलं अशी प्रतिक्रिया Realme इंडियाचे CEO माधव सेठ यांनी दिली आहे.

Realme 3 स्मार्टफोनची काही खास वैशिष्ट्य

  • Realme 3 हा स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.2 इंच आहे.
  • हा फोन रेडिईंट ब्लू, डायनामिक ब्लॅक आणि क्लासिक ब्लॅक या तीन रंगात उपलब्ध आहे.
  • यात MediaTek Helio P70 ऑक्टाकोर 2.1 गीगाहर्टझ आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोसेसर देण्यात आलं आहे.
  • या फोनमध्ये ड्यूल सिम आणि मेमरी कार्ड स्लॉट देण्यात आलं आहे.
  • Realme 3 या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी 256 जीबीपर्यंत वाढवता येते.
  • या फोनची बॅटरी 4 हजार 230 mAh आहे. हा स्मार्टफोन Android Pie च्या 9.0 यावर काम करतो.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.