Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत
शाओमीचा सब ब्रॅण्ड असलेल्या Redmi चा K30S हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे.
बीजिंग : शाओमीचा (Xiaomi) सब ब्रॅण्ड असलेल्या Redmi चा K30S हा स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या फोनची सर्वत्र चर्चा आहे. अखेर हा फोन आता ग्राहकांसाठी उपलब्ध होणार. रेडमीने याबाबत म्हटले आहे की, हा शाओमी Mi 10T चं रिब्रॅण्डेड व्हर्जन आहे. Mi 10T गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला आहे. Redmi K30S ची किंमत 28,570 रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक आणि सिल्व्हर या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. (Redmi K30S launched with 144hz display and 5000mAh battery, Check specifications and price)
रेडमी K30S मध्ये 6.67 इंचांचा फुल्ल HD+ डिस्प्ले आहे. या फोनची सर्वात खास गोष्ट म्हणजे याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. याच्या डिस्प्लेवर कॉर्निंग गोरिला ग्लास 5 चं प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. या हँडसेटमध्ये ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो अॅड्रेनो 650 जीपीयूसोबत जोडला आहे. हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबतची माहिती कंपनीने जाहीर केलेली नाही.
रेडमीचा हा फोन अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे. 256 जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला व्हेरिएंटदेखील लाँच करण्यात आला आहे. युजर्स ही मेमरी मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवू शकतात. या फोनमध्ये साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि स्टीरियो स्पीकर्स देण्यात आले आहेत.
या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यामध्ये 64 मेगापिक्सलच्या मेन सेन्सर आणि f/1.8 अॅपर्चर, 13 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड आणि f/2.4 अपर्चर, 5 मेगापिक्सल लेन्स आहे. 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (सेल्फी कॅमेरा) देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरीदेखील आहे.
संबंधित बातम्या
दिवाळीसाठी शॉपिंग लिस्ट तयार करा, फ्लिपकार्टचा नवा सेल येतोय
सणासुदीच्या मुहूर्तावर ‘हे’ पाच किफायतशीर स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फिचर्स
Nokia 215 4G आणि Nokia 225 4G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री
(Redmi K30S launched with 144hz display and 5000mAh battery, Check specifications and price)