रॉयल एनफिल्डचं नवं मॉडल भारतात, पाहा किंमत आणि फीचर

मुंबई : तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बुलेट क्रेझ आहे. स्पोर्ट्स बाईकनंतर आता बुलेटलाही जास्त मागणी आहे. रॉयल एनफिल्डने नवीन सिंगल चॅनल ABS आणि रिअर लिफ्ट प्रोटेक्शनसह बुलेट 350 आणि 350 ES लाँच केली. लाँच करण्यात आलेल्या दोन्ही बुलेट अपडेट करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच नवीन नियमांनुसार 1 एप्रिलपासून वेगवेगळ्या इंजिन डिस्प्लेसमेंटनुसार टूव्हिलर्समध्ये CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम) किंवा […]

रॉयल एनफिल्डचं नवं मॉडल भारतात, पाहा किंमत आणि फीचर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई : तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात बुलेट क्रेझ आहे. स्पोर्ट्स बाईकनंतर आता बुलेटलाही जास्त मागणी आहे. रॉयल एनफिल्डने नवीन सिंगल चॅनल ABS आणि रिअर लिफ्ट प्रोटेक्शनसह बुलेट 350 आणि 350 ES लाँच केली. लाँच करण्यात आलेल्या दोन्ही बुलेट अपडेट करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. तसेच नवीन नियमांनुसार 1 एप्रिलपासून वेगवेगळ्या इंजिन डिस्प्लेसमेंटनुसार टूव्हिलर्समध्ये CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टम) किंवा ABS (एंटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) असणे अनिवार्य आहे.

रॉयल एनफिल्ड बुलेटच्या अपडेटनंतर 350 ची किंमत 3,500 रुपये आणि बुलेट 350 ES ची किंमत 1,400 रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे. कंपनीने आपले सर्व मॉडल ABS सोबत अपडेट केले आहेत. नवीन नियमांनुसार 1 एप्रिल 2019 नंतर 125 cc पेक्षा जास्त इंजिन असणाऱ्या टूव्हीलर्समध्ये ABS आणि 125cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या टू-व्हिलर्समध्ये CBS असणे गरजेचे आहे.

रॉयल एनफिल्डच्या सर्व बाईक्स ड्युअल चॅनलमध्ये देण्यात आल्या आहेत. तर बुलेट 350 आणि 350 ES मध्ये सिंगल चॅनल ABS युनीट देण्यात आला आहे. ड्युअल चॅनल ABS ब्रेकिंग दरम्यान दोन्ही व्हिल्सला मॉनिटर करतात आणि स्लिप होण्यापासून वाचवतात. तर सिंगल चॅनल ABS हेच काम फक्त एका व्हिलमध्ये करतात. सिंगल चॅनल बऱ्याचदा फ्रंट व्हिलमध्ये वापरला जातो.

इंजिन

रॉयल एनफिल्ड बुलेट 350 आणि 350 ES मध्ये जुनेच 346cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कूल इंजिन दिले आहे. या इंजिनमध्ये 19.8 bhp पॉवर आणि 28 Nm चा पिक टॉर्क जनरेट करतात. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स आहे.

किंमत 

350 ES च्या किंमतीत 1400 आणि 350 च्या किंमतीत  3,500 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ सिंगल चॅनल ABS मुळे झाली आहे. जर ड्युअल चॅनल ABS दिला तर याची किंमत 11,000 रुपयांपर्यंत वाढू शकते. ABS रॉयल एनफिल्ड बुलेट 350 ची किंमत 1.21 लाख आहे आणि 350 ES ची किंमत 1.35 लाख रुपये आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.