टिक-टॉकचा नवा विक्रम, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपलाही मागे टाकलं

तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरलेल्या टिक टॉकने नवा विक्रम केला आहे (New record of TikTok App). फेब्रुवारी 2020 मध्ये टिकटॉक सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे.

टिक-टॉकचा नवा विक्रम, फेसबूक आणि व्हॉट्सअॅपलाही मागे टाकलं
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 2:40 PM

मुंबई : तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरलेल्या टिक टॉकने नवा विक्रम केला आहे (New record of TikTok App). फेब्रुवारी 2020 मध्ये टिकटॉक गूगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) आणि अॅपल अॅप स्टोअरवर (Apple App Store) सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. सेन्सर टॉवरच्या (Sensor Tower report) अहवालानुसार उत्पन्न (रेव्हेन्यू) आणि वापर (इन्स्टॉल) दोन्हींमध्ये या महिन्यात टिकटॉकने बाजी मारली आहे. अशाप्रकारे आता टिक टॉक, व्हॉट्सअॅप आणि फेसबूकपेक्षा अधिक लोकप्रिय ठरलं आहे.

सेन्सरच्या अहवालानुसार मागील महिन्यात टिकटॉक अॅप भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं. भारतातील अॅप डाऊनलोडची संख्या 4 कोटी 66 लाख इतकी आहे. ब्राझीलमध्ये हीच संख्या 97 लाख आणि अमेरिकेत 64 लाख आहे.

टिक टॉकला गूगल प्ले स्टोअरवर फेब्रुवारी 2020 मध्ये जवळपास 9 कोटी 32 लाख (93.2 मिलिअन) वेळा इन्स्टॉल करण्यात आलं. याआधी हे अॅप केवळ 1 कोटी 97 वेळा डाऊनलोड झालं होतं. टिक टॉक आल्यानंतर प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर एकूण 1.9 अब्ज वेळा इन्स्टॉल करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी 2020 टिक टॉकसाठी सर्वाधिक कमाई करुन देणारा महिना ठरला आहे. टिक टॉकने या महिन्यात 5 कोटी 4 लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. यात सर्वाधिक कमाई चीनमधून झाली आहे. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनमधून कमाई झाली. भारतात हे अॅप सर्वाधिक वेळा डाऊनलोड झालं असलं तरी उत्पन्न देण्यात टॉपच्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही.

New record of TikTok App

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.