13 मिनिटांत 4,000mAh ची बॅटरी फूल चार्ज होणार, Vivo ची नवी टेक्नॉलॉजी
चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने एक आश्चर्यचकित करणारा लाईव्ह डेमो केला. कंपनीने Super Flash Charge टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 120W वापरत 4,000mAh च्या बॅटरीला फक्त 13 मिनिटांत चार्ज केलं.
मुंबई : चीनची स्मार्टफोन कंपनी Vivo ने एक आश्चर्यचकित करणारा लाईव्ह डेमो केला. कंपनीने Super Flash Charge टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून 120W वापरत 4,000mAh च्या बॅटरीला फक्त 13 मिनिटांत चार्ज केलं. 13 मिनिटांत 4,000mAh ची बॅटरी फूल चार्ज होणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. मात्र, फास्ट चार्जिंगचा कॉन्सेप्ट हा काही नवा नाही. OnePlus ने डॅश चार्जिंग आणि Oppo ने VOOC नेही लोकांना आपल्या फास्ट चार्जिंगने आश्चर्यचकित केलं. पण हे त्याहीपेक्षा फास्ट आहे.
#vivo #quickcharge Vivo announced 120w super flash charge, 13 minutes full of 4000mAh battery, charging after ten minutes really can do it. Not bad) pic.twitter.com/PgnhEKqi32
— Xiaomishka (@xiaomishka) June 20, 2019
वीवोने एक लाईव्ह डेमोचा व्हिडीओ जारी केला. यामध्ये 120W सुपर फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फक्त 13 मिनिटांत 4,000mAh ची बॅटरी फूल चार्ज करण्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडीओ चीनी सोशल मीडिया Weibo वर पोस्ट करण्यात आला. वृत्तानुसार, Vivo ने 4,000mAh ची बॅटरीला केवळ 14 सेकंदात 2.38% चार्ज केल्याचा दावा केला. कंपनीने सोशल मीडियावरही याबाबत पोस्ट केली.
चीनच्याच Xiaomi कंपनीने 100W Super Charge Turbo टेक्नॉलॉजी शोकेस केली होती. याअंतर्गत 17 मिनिटांत 4,000mAh च्या बॅटरी फूल चार्ज करण्याचा दावा केला. मात्र, Vivoची ही टेक्नॉलॉजी शाओमीपेक्षाही फास्ट आहे आणि यामुळे 4,000mAh ची बॅटरी 4 मिनिटांत चार्ज होते.
शांघाईमध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसदरम्यान Vivo कंपनी पहिला 5G स्मार्टफोन लाँच करेल, असंही कंपनीने सांगितलं. शांघधाईमध्ये येत्या 26 पासून मोबाईल वर्ल्ड काँग्रेसला सुरुवात होणार आहे. यावेळी कंपनी आपल्या नव्या स्मार्टफोनमध्येही ही टेक्नॉलॉजी वापरुन त्याचा डेमो करण्याची शक्यता आहे.
Vivo च्या 120W चार्जिंगने फक्त 8 मिनिटांत 0 ते 51 टक्के बॅटरी चार्ज होऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, सध्या कंपनीने फक्त डेमो दिला. याला कंपनी कधी लाँट करणार आणि स्मार्टफोनमध्ये ही टेक्नॉलॉजी कधी देण्यात येईल याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.
Vivo प्रमाणेच अनेक कंपन्या बॅटरी लवकर चार्ज करण्यावर जोर देत आहेत मात्र, कुणीही बॅटरी बॅकअपकडे लक्ष देत नसल्याचं दिसून येत आहे. तुम्ही 5,000mAh ची बॅटरी असलेला स्मार्टफोनही घेतला तरी त्यामध्ये बॅटरी बॅकअपची समस्या असते. त्यामुळे कंपन्यांना आता फास्ट चार्जिंगसोबतच बॅटरी टेक्नॉलॉजीवरही काम करायला हवं.
संबंधित बातम्या :
सॅमसंगची टेक्नोलॉजी वापरुन शाओमी सर्व कंपन्यांना मागे टाकणार
Xiaomi -Mito चा ट्रिपल फ्लिप कॅमेरा स्मार्टफोन लवकरच लाँच होणार
Redmi चे एकाचवेळी तीन स्मार्टफोन लाँच होणार
मोबाईल नाही, कानाला फक्त बोट लावून बोला, हिंगोलीतील तरुणाचं संशोधन