व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवं फीचर

भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅपचे यूजर्स आहेत. व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केले आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव आहे.

व्हॉट्सअॅप युजर्ससाठी नवं फीचर
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 2:06 PM

मुंबई : भारतात मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅपचे युजर्स आहेत. व्हॉटसअॅपने एक नवं फीचर लाँच केलं आहे. ‘Frequently forwarded’ असं या नव्या फीचरचं नाव आहे. या फीचरच्या माध्यमातून एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे हे समजू शकणार आहे. अशा मेसेजवर एक डबल अॅरोवाल एक आयकॉन येईल.

भारतात मोठ्या प्रमाणात फेकन्यूज व्हायरल केल्या जातात. व्हॉटसअॅपच्या माध्यमातून तर याचे प्रमाण आणखी वाढले आहे. याला आळा बसावा म्हणून व्हॉटसअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यावर मर्यादा आणली. त्यामुळे आता फक्त एक मेसेज एकावेळी पाच लोकांना सेंड करता येतो.

‘Frequently forwarded’ या फीचरवर गेले काही दिवस व्हॉटसअॅप काम करत होते. जर एखाद्या मेसेजला 5 पेक्षा अधिक वेळा फॉरवर्ड केल्यास त्यावर लेबल दिसेल. व्हॉटसअॅपच्या मते एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे, याची माहिती एण्ड-टू-एण्ड एनक्रिप्ट राहील याचा अर्थ ही माहिती इतर कुणी पाहू शकणार नाही.

व्हॉटसअॅप चेन मेसेजवरही कशाप्रकारे रोख लावता येईल यावर काम करत आहे. व्हॉट्सअॅपवर बरेच चेन मेसेज फिरत असतात. त्यावरही आता लवकरच रोख बसू शकतो. व्हॉट्सअॅपच्या या बदलामुळे ग्रुप चाटिंग सोईस्कर होऊ शकते.

गेल्यावर्षी व्हॉटसअॅपने forwarded लेबल लाँच केलं होतं. हे फीचर जगभरात वापरलं जातं. व्हॉटसअॅपवरही फॉरवर्डेड मेसेजवर forwarded असं लिहिलेलं येते. कंपनीच्या या निर्णयांमुळे फेक न्यूजवर बऱ्यापैकी रोख लागलेला दिसत आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.