WhatsApp मधील ‘या’ 5 दमदार फिचर्सचा वापर करायलाच हवा
WhatsApp मध्ये काही विशिष्ट फिचर्स आहेत, ज्यांचा युजर वापर करत नाहीत. तर काही फिचर्स युजर्सना माहीत नाहीत.
मुंबई : WhatsApp भारतात सर्वात जास्त वापरलं जाणारं अॅप आहे. या अॅपमध्ये काही असे फिचर्स आहेत, ज्यांचा युजर वापर करत नाहीत. तर काही फिचर्स युजर्सना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच WhatsApp मधील दमदार फिचर्सची माहिती देणार आहोत. (Whatsapp five features you should try out now)
5MB पेक्षा मोठ्या फाईल्स कशा डिलीट करायच्या?
तुमच्या फोनमधील स्टोरेज स्पेस कमी आहे किंवा तुमची स्टोरेज स्पेस भरली आहे, तर तुम्ही 5 एमबीपेक्षा मोठ्या आकाराच्या फाईल्स डिलीट करायला हव्यात. यासाठी तुम्हाला सेटिंग्स – स्टोरेज, डेटा आणि मॅनेज स्टोरेजमध्ये जावं लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिसेल की, 5 एमबीपेक्षा मोठ्या फाईल डिलीट करा. त्यावर क्लिक करुन तुम्ही 5 एमबीपेक्षा मोठ्या आकाराच्या सर्व फाईल्स डिलीट करु शकता. याद्वारे तुम्ही तुमचा वेळ आणि मोबाईलमधील स्टोरेज स्पेस वाचवू शकता.
मेसेज वाचायचा आहे परंतु समोरच्या युजरला कळू द्यायचं नाही की तुम्ही मेसेज वाचला आहे, अशा वेळी काय कराल?
जर तुम्ही व्हॉट्सअॅप वेबचा वापर करत असाल आणि तुम्हाला एखादा मेसेज आला आहे, जो तुम्हाला वाचायचा आहे, परंतु मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला कळू द्यायचे नाही की तुम्ही मेसेज वाचला आहे. अशावेळी तुम्ही तुमच्या माऊसचा कर्सर त्या युजरच्या चॅटवर न्या, तिथे एका छोट्याशा विंडोमध्ये त्या युजरने पाठवलेला मेसेज दिसेल आणि मसेज अनरिड राहील.
ब्लू टिकविना मेसेज वाचला आहे की नाही, हे कसं चेक करायचं?
काही युजर्स WhatsApp मधील रिड रिसिप्ट पर्याय बंद ठेवतात. त्यामुळे त्या युजरने आपला मेसेज वाचला तरी आपल्याला ब्लू टिक दिसत नाही. अशा वेळी आपण त्या युजरला ऑडिओ मेसेज पाठवू शकतो. युजरने ब्लू टिक ऑप्शन बंद ठेवला असला तरी तुम्हाला मेसेज वाचला आहे की नाही हे कळू शकेल. कारण ब्लू टिक फिचर ऑडिओ फाईलसाठी लाईव्ह असतं.
महत्त्वाचा मेसेज कसा शोधायचा
एखाद्या युजरने तुम्हाला महत्त्वाचा मेसेज पाठवला असेल आणि तुम्हाला तो मेसेज मिस करायचा नसेल, अथवा तो मेसेज पुन्हा पाहायचा असेल, परंतु तुम्हाला तो मेसेज शोधण्यासाठीचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तो मेसेज स्टार मार्क करुन ठेवू शकता. मेसेजवर क्लिक केल्यावर स्टार आयकॉनवर क्लिक केल्यानंतर मेसेज स्टार होईल. तर स्टार करुन ठेवलेला मेसेज पुन्हा पाहण्यासाठी अॅपमधील वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करा, तिथे स्टार्र्ड मेसेज असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा स्टार केलेला मेसेज दिसेल.
व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या सर्व ऑडिओ/व्हिडीओ फाईल्स कशा शोधायच्या?
यासाठी सर्वात आधी व्हॉट्सअॅपवरील सर्च बारवर क्लिक करा. तिथे तुम्हाला मेन्शंड असा पर्याय दिसेल. तिथे तुम्ही कोणालाही सिलेक्ट करु शकता. आता तुम्हाला फोटो, जिफ किंवा इतर फाईल्सची लिस्ट दिसेल.
संबंधित बातम्या
Whatsapp वरुन पैसे ट्रान्सफर कसे कराल? जाणून घ्या नव्या फिचरची स्टेप बाय स्टेप माहिती
WhatsApp चं नवं फीचर, स्टोरेज कमी करणं आणि फाईल्स डिलीट करणं आणखी सोपं
WhatsApp मध्ये नवीन फिचर; मेसेज आपोआप डिलीट होणार!
(Whatsapp five features you should try out now)