लवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार
मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे.
बीजिंग : मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (एमडब्ल्यूसी) 2019 मध्ये शाओमीने एमआयएक्स 3 स्मार्टफोन लाँच केला. हा फोन लाँच केल्यानंतर शाओमी आता MIX 4 लाँच करणार आहे. या नव्या फोनमध्ये तब्बल 64 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे, असं शाओमीचे प्रोडक्ट डायरेक्टर वांग टेंग थॉमस म्हणाले.
एमआय MIX 4 मध्ये एक कॅमेरा असेल जो 64 मेगापिक्सल सॅमसंग जीडब्ल्यू 1 सेन्सरपेक्षा उत्कृष्ट असेल. नव्या फोनमध्ये 2 के एचडीआरचा 10 प्लस डिस्प्ले दिलेला आहे. तसेच डिव्हाईसमध्ये 115 अंकाचा डीएक्सओ मार्क स्कोअर असेल. अद्याप फोनच्या फीचरबद्दल माहिती मिळालेली नाही.
लिक झालेल्या माहितीनुसार, हा नवीन स्मार्टफोन पाणी आणि धूळीपासून बचाव करेल. यासाठी हा फोन आयपी 68 प्रमाणनचा सपोर्ट करेल. यापूर्वी रिअलमीनेही 64 मेगापिक्सलचा फोन लाँच करणार असल्याचे म्हटले होते. रिअलमीही या फोनवर काम करत आहे.
रिअलमीचे सीईओ माधव सेठ यांनीही 64 मेगापिक्सल सॅमसंग जीडब्ल्यू 1 सेंसरचा एक फोटो ट्वीट केला होता. यामध्ये ते म्हटले होते की, कॅमेरा सेंसरला संघटीत करणारा सर्वात पहिला फोन भारतात लाँच होईल.
शाओमी आणि रिअलमी दोन्ही कंपन्या लवकरच 64 मेगापिक्सलचा फोन लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे दोन्ही कंपनीमध्ये मोठी स्पर्धा सुरु आहे. दोन्ही कंपनीत कुणाचा फोन उत्कृष्ट ठरेल हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.