‘Redmi’ चे तीन स्मार्टफोन एकाचवेळी लाँच होणार!
शाओमी कंपनीद्वारे येत्या 15 जुलैला Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्यासोबतच Redmi 7A हा स्मार्टफोनही कंपनी बाजारात लाँच करणार आहे.
नवी दिल्ली : भारतात MI या स्मार्टफोन कंपनीचे अनेक चाहते आहे. दिवसेंदिवस MI च्या स्मार्टफोनची क्रेझ वाढत असून, शाओमी कंपनीद्वारे येत्या 15 जुलैला Redmi K20 आणि Redmi K20 Pro हे दोन स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे. त्याच दरम्यान Redmi 7A हा आणखी एक नवा फोन लाँच केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
XDA developer ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 3 महिन्यात MI कंपनीद्वारे तीन नवे स्मार्टफोन भारतात लाँच केले जाणार आहे. Redmi 7A, Redmi K20, Redmi K20 Pro अशी या तीन स्मार्टफोनची नावे आहेत. MI च्या कंपनीने Redmi 7A हा स्मार्टफोन इतर देशात याआधीच लाँच केला आहे. त्यामुळे लवकरच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र याबाबत कंपनीद्वारे कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
चीनमध्ये Redmi 7A या स्मार्टफोनची किंमत 549 युआन म्हणजेच केवळ 5 हजार 500 रुपये आहे. या फोनचे दोन व्हेरियंट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. मात्र भारतात या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरियंट लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील एका व्हेरिंयटची किंमत केवळ 5 हजार 500 रुपये आहे. या फोनचे दोन व्हेरियंट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. मात्र भारतात या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरियंट लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील एका व्हेरियंटमध्ये 3GB+32GB स्टोअरेज देण्यात येणार आहे. हेच व्हेरियंट भारतात लाँच होऊ शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
All rise for #RedmiK20Pro – the World’s Fastest smartphone! Breaking barriers is a habit. And it all starts today. pic.twitter.com/pycF1DGbTY
— Redmi India (@RedmiIndia) June 17, 2019
Redmi 7A या स्मार्टफोनमध्ये 5.4 इंच एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्यासोबतच यात Qualcomm Snapdragon 439 हे प्रोसेसरही देण्यात आले आहे. तसेच या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सलाचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची बॅटरी 4000 mAh क्षमतेची देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये Android 9 Pie हे लेटेस्ट अँड्राईड वर्जन देण्यात येणार आहे.
Redmi K20 आणि Redmi K20 Pro फोनची वैशिष्ट्य
या फोनचा डिस्प्ले 6.39 इंच AMOLED full-HD असणार आहे. या फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले असून प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल, सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सल, तर 8 मेगापिक्सलचा टेरिटेअरी कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष म्हणजेच पहिल्यांदाचा MI च्या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा पॉपअप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याशिवाय या फोनची 4000 mAh बॅटरीची क्षमता आहे. या फोनमध्ये Android Pie हे अँड्रॉईड वर्जन देण्यात आलं आहे. हा जगातील सर्वात वेगवान फोन असेल असा दावा कंपनीने केला आहे.
संबंधित बातम्या :
Redmi चा पॉप अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन लवकरच बाजारात, किंमत तब्बल….