Xiaomi Redmi Note 7 : काही मिनिटांतच तब्बल दोन लाख फोन्सची विक्री
मुंबई : शाओमी कंपनीचा Xiaomi Redmi Note 7 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यातच भारतात लाँच झाला. बुधवारी 6 मार्चला या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता. सेल सुरु होताच काही वेळातच हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक गेला. लोकांनी मोठ्या प्रमाणात हा स्मार्टफोन खरेदी केला. Xiaomi कंपनीने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. कंपनीने ट्वीट करत सांगितले की काहीच […]
मुंबई : शाओमी कंपनीचा Xiaomi Redmi Note 7 हा स्मार्टफोन गेल्या आठवड्यातच भारतात लाँच झाला. बुधवारी 6 मार्चला या स्मार्टफोनचा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता. सेल सुरु होताच काही वेळातच हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉक गेला. लोकांनी मोठ्या प्रमाणात हा स्मार्टफोन खरेदी केला. Xiaomi कंपनीने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. कंपनीने ट्वीट करत सांगितले की काहीच मिनिटांत या स्मार्टफोनचे दोन लाख युनिट विकले गेले आहेत.
Mi fans, we can’t get over this madness. 200K+ units of #RedmiNote7 sold in a matter of minutes. A big thank you to all of you!
RT to win F-codes!
Get your #RedmiNote7 and #RedmiNote7Pro on 13th March at 12 noon on https://t.co/cwYEXdVQIo and @Flipkart. pic.twitter.com/qQtA9jyFyt
— Redmi India (@RedmiIndia) March 7, 2019
हा सेल 6 मार्चला ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट, Mi होम आणि Mi.com वर दुपारी 12 वाजता ठेवण्यात आला होता. यावेळी सेल सुरु होताच अक्षरश: काही मिनिटांत या स्मार्टफोनचे दोन लाखाहून अधिक स्मार्टफोन विकले गेले. त्यामुळे अवघ्या काही वेळातच हा फोन आउट ऑफ स्टॉक गेला. त्यामुळे अनेकांना हा स्मार्टफोन खरेदी करता आला नाही. मात्र, कंपनीने 13 मार्चला पुन्हा हा सेल ठेवला आहे. 13 मार्चला दुपारी 12 वाजता हा सेल असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हा स्मार्टफोन घेऊ शकला नसाल, तर तुम्ही 13 मार्चला तो घेऊ शकता. यावेळी Xiaomi Redmi Note 7 आणि Xiaomi Redmi Note 7 Pro हे दोन्ही स्मार्टफोन सेलमध्ये असणार आहेत.
Redmi Note 7 स्पेसिफिकेशन्स
Xiaomi Redmi Note 7 मध्ये 6.3 चा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रिन आणि बॅक पॅनलच्या सुरक्षेसाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. शिवाय सेल्फीसाठी सिंगल फ्रंट कॅमेरा आहे. Note 7 मध्ये 12+2 मेगापिक्सेलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर फ्रंटसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा आहे.
हा स्मार्टफोन 3 जीबी आणि4 जीबी रॅम या दोन्ही व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबीच्या व्हेरिअंटची किंमत 11,999 रुपये इतकी आहे.