Xiaomi ची रेकॉर्डब्रेक विक्री सुरुच, तीन महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्सची विक्री

ग्लोबल रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आईडीसी) रिपोर्टनुसार यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित भारतात 5.43 कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे.

Xiaomi ची रेकॉर्डब्रेक विक्री सुरुच, तीन महिन्यात 1.35 कोटी स्मार्टफोन्सची विक्री
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 12:35 PM

मुंबई : भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यापासून देशातत boycott china, boycott chinese products चा नारा दिला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतात चिनी कंपन्या सातत्याने त्यांच्या वस्तूंची रेकॉर्डब्रेक विक्री करत आहेत. चिनी मोबाईल कंपनी शाओमी इंडियाने (Xiaomi India) गेल्या तीन महिन्यांत देशभरातील मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. (Xiaomi India’s record break sale in India)

ग्लोबल रिसर्च फर्म इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (आईडीसी) रिपोर्टनुसार यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित भारतात 5.43 कोटी स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. या रिपोर्टचा विचार केला तर दरवर्षीच्या तुलनेत भारतातील मोबाईल विक्रीत 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला चीन आणि अमेरिकेत मात्र मोबाईलच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

रिपोर्टमधील माहितीनुसार भारतात विक्री करणाऱ्या मोबाईल कंपन्यांमध्ये Xiaomi कंपनी सर्वात वर आहे. यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित शाओमीने भारतात 13.5 मिलियन (1.35 कोटी) मोबाईल्सची विक्री केली आहे. शाओमीच्या Redmi 8A Dual, Redmi 8 आणि Redmi Note 9 या मोबाईल्सना भारतीय ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या तिमाहित शाओमीचा सब ब्रॅण्ड Poco च्या 10 लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. भारतातील ऑनलाईन मार्केटमध्ये एकट्या शाओमीचा 35 टक्के वाटा आहे.

सॅमसंग दुसऱ्या स्थानी

स्मार्टफोन्स विक्रीच्या बाबतीत सॅमसंग (Samsung) कंपनी दुसऱ्या नंबरवर आहे. अमेरिकेनंतर सॅमसंगसाठी भारत दुसऱं सर्वात मोठं मार्केट आहे. जागतिक बाजारात सॅमसंगचा 15 टक्के वाटा आहे. जागतिक मार्केटमध्ये सर्वाधिक पसंती मिळालेल्या टॉप 5 स्मार्टफोनमध्ये सॅमसंगच्या Galaxy M21 आणि M31 चा समावेश आहे.

शाओमी आणि सॅमसंगसह भारतीय मार्केटमध्ये यावर्षीच्या तिसऱ्या तिमाहित Vivo, Realme आणि Oppo या कंपन्यांनी क्रमशः 9 मिलियन, 8 मिलियन आणि 6.1 मिलियन स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. यासह अॅपल आणि वनप्लस या दोन कंपन्यांचाही दबदबा पाहायला मिळाला.

एका आठवड्यात 50 लाख स्मार्टफोन्सची विक्री

ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात शाओमीने भारतात 50 लाख स्मार्टफोनची विक्री करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे. शाओमीच्या या यशात दोन ई-कॉमर्स वेबसाईट्सचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल आणि फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमुळे शाओमीला हा रेकॉर्ड बनवता आला.

संबंधित बातम्या

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Xiaomi ची नवीन टेक्नॉलोजी, आता 19 मिनिटात बॅटरी चार्ज होणार

Xiaomi चा 20 व्हॅटचा फास्ट चार्जर लाँच, IPhone 12, Galaxy s10 सह अनेक फोन चार्ज करणार

(Xiaomi tops indian smartphone market samsung becomes second and fastest growing brand too)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.