होंडा कारवर तब्बल 1.15 लाखांची सूट
कार कंपनी जूनमध्ये शानदार डिस्काऊंट ऑफर देत आहेत. विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कार कंपनी डिस्काऊंट देत असल्याचे म्हटलं जात आहे. होंडाच्या कारवर 1.15 लाख रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.
मुंबई : कार कंपनी जूनमध्ये शानदार डिस्काऊंट ऑफर देत आहेत. विक्रीमध्ये घट झाल्यामुळे कार कंपनी डिस्काऊंट ऑफर देत असल्याचे म्हटलं जात आहे. होंडाच्या कारवर 1.15 लाख रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे. जर तुम्हालाही होंडाची कार खरेदी करायची असेल, तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे.
ब्रिओ
होंडाने ही हॅबचॅक कार बंद केली आहे, पण स्टॉकमध्ये या कार उपलब्ध आहेत. या कारवर कंपनी 24 हजार रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या ऑफर्सचा समावेश आहे. होंडा ब्रिओमध्ये 88hp पॉवर आणि 1.2 लीटरचे इंजिन दिले आहे. या कारची किंमत 4.73 लाख रुपये आहे.
सिविक
होंडाच्या या प्रिमियमवर 30 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. यामध्ये एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काऊंटसारखे वेगवेगळ्या ऑफर्सचा समावेश आहे. या ऑफर सिविकच्या पेट्रोल आणि डिझलच्या दोन्ही मॉडलवर आहेत. होंडाने 7 वर्षानंतर नवीन सिविक पुन्हा लाँच केली आहे. यामध्ये 141hp पावरचे 1.8 लीटर पेट्रोल आणि 120hp पावरचे 1.6 लीटरचे इंजिन दिले आहे. होंडा सिविकची सुरुवाती किंमत 17.72 लाख रुपये आहे.
अमेज
होंडाच्या या पॉप्युलर सब-कॉम्पैक्ट सिडॅनवर 42 हजार रुपयांचा फायदा घेऊ शकता. या कारमध्ये 1.2 लीटरचे पेट्रोल आणि 1.5 लीटरचे इंजिन दिले आहे. होंडा अमेजची किंमत 5.88 लाख रुपये आहे.
डब्लूआर-व्ही
होंडाच्या या क्रॉसओव्हर एसयूव्हीवर 45 हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. ही एसयूव्ही प्रिमियम हॅचबॅक जॅजवर आधारित आहे. यामध्ये 90hp पावरचे 1.2 लीटर पेट्रोल आणि 100hp पावरचे 1.5 लीटर डीझेल इंजिन दिले आहे. या कारची किंमत 7.84 लाख आहे.
जॅज
जॅज प्रीमियम हॅचबॅक कारवर 55 हजार रुपयापर्यंतचा डिस्काऊंट दिला जात आहे. या कारमध्ये 90hp पावरचे 1.2 लीटर पेट्रोल आणि 100hp पावरचे 1.5 लीटर डीजल इंजिन दिले आहे. या कारची किंमत 7.42 लाख आहे.
सिटी
होंडाच्या या प्रसिद्ध मिड-साईज सिडॅन कारवर 62 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. होंडा सिटीमध्ये 119hp पावरचे 1.5 लीटर पेट्रोल आणि 100hp पॉवरचे 1.5 लीटरचे डीझेल इंजिन दिले आहे. या कारची किंमत 9.72 लाख आहे.
बीआरव्ही
या एसयूव्हीवर 1.15 लाख रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये 100hp पावरचे 1.5 लीटर डीझेल आणि 119 पावरचे 1.5 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. होंडा बीआरव्ही ची किंमत 9.53 लाख रुपये आहे.