आता टाईप करु नका फक्त इमोजी पाठवा, लवकरच नवीन 230 इमोजी

मुंबई : whatsApp आणि Facebook सारख्या सोशल मीडियाचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती चॅटिंग करताना ईमोजीचा वापर करतो. याच ईमोजीच्या लिस्टमध्ये आता नवीन 230 ईमोजींचा समावेश होणार आहे. नुकतेच युनिकोडने 2019 साठी नवीन 230 ईमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली. या लिस्टमध्ये 59 नवीन ईमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे, असे मिळून सर्व 230 होतात. या नवीन इमोजीमध्ये […]

आता टाईप करु नका फक्त इमोजी पाठवा, लवकरच नवीन 230 इमोजी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : whatsApp आणि Facebook सारख्या सोशल मीडियाचा वापर करणारा प्रत्येक व्यक्ती चॅटिंग करताना ईमोजीचा वापर करतो. याच ईमोजीच्या लिस्टमध्ये आता नवीन 230 ईमोजींचा समावेश होणार आहे. नुकतेच युनिकोडने 2019 साठी नवीन 230 ईमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली.

या लिस्टमध्ये 59 नवीन ईमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे, असे मिळून सर्व 230 होतात. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा यामध्ये समावेश आहे.

याशिवाय इमोजीमध्ये व्हीलचेअरवर बसलेला माणूस, गाईड डॉगसारखे नवीन ईमोजींचा समावेश आहे. तसेच युनिकोडने काही नवीन रंगाचे चिन्हंही प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये ह्रदय, सर्कल आणि क्सॉयर शेपचे सर्व चिन्हं आहेत. यासोबतच युजर्सच्या मागणीनुसार सफेद ह्रदयाच्या चिन्हांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

हे इमोजी फायनल करण्यात आले असले तरी काही दिवसानंतर मोबाईलमध्ये आपल्या उपलब्ध होणार आहेत. नवीन इमोजी या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत आपल्या मोबाईलमध्ये येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सोशल मीडियावर दररोज एकूण 90 कोटी युजर्स एकमेकांना इमोजी सेंड करतात. या प्रत्येक इमोजीचा अर्थ जाणून घेण्यासाठी इमोजीपीडियासुद्धा बनवण्यात आलं आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक इमोजीची माहिती दिली जाईल. युनिकोड स्टँडर्ड लिस्टमध्ये 2666 इमोजी आहेत. आज अनेकजण आहेत जे सोशल मीडियावर इमोजीच्या माध्यमातून व्यक्त होतात आणि आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहचवतात. दिवसेंदिवस इमोजीच्या वापरातही वाढ होत आहे.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.