50 MP कॅमेरा आणि रिप्लेसेबल बॅटरीचा 5G फोन 10 हजाराच्या आत मिळतोय

जर तुमचे बजेट 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि तुम्हाला चांगल्या क्षमतेची बॅटरी हवी असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. हा फोन तुम्हाला कमी बजेटमध्ये एक चांगले फिचर्स असलेला रिप्लेसेबल बॅटरीचा स्मार्टफोनचा पर्याय देऊ शकतो.

50 MP कॅमेरा आणि रिप्लेसेबल बॅटरीचा 5G फोन 10 हजाराच्या आत मिळतोय
NOKIA Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 1:28 PM

मुंबई | 13 मार्च 2024 : तुम्हाला जर दहा हजाराच्या आत 5G चा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर बाजारात अनेक ऑप्शन आहेत. परंतू जर ग्राहकांना कमी पैशात चांगला ब्रॅंडचा फोन खरेदी करायचा असेल तर आता नोकीयाचा एक मोबाईल फोन चांगला पर्याय उपलब्ध आहे. दहा हजार रुपये एवढ्या कमी किंमतीत रिप्लेसेबल बॅटरीचा फोन खरेदी करता येऊ शकतो. नोकियाचा Nokia G42 5G फोन बाजारात एक उत्तम पर्याय आहे.

नोकियाच्या 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

नोकिया आजही विश्वासार्ह ब्रॅंड आहे. या फोनची शानदार बॅटरी आणि इतर वैशिष्ट्यांमुळे तो खरेदी करण्यासाठी चांगला पर्याय आहे. प्रोसेसर, रॅम आणि स्टोरेज – नोकिया Nokia G42 5G फोनमध्ये Snapdragon 480 + 5G प्रोसेसर सह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 2GB व्हर्च्युअल रॅम आणि 1 TB पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट मिळतो. याशिवाय 6GB+5GB/8GB+8GB रॅम आणि 256 GB स्टोरेज ऑप्शन सह देखील उपलब्ध आहे.

डिस्प्ले

या स्मार्टफोनला 6.56 इंच, 90Hz refresh rate, 560 nits with brightness boost, HD+ ( 720 x 1612 ) रिझोल्युशन, Corning Gorilla Glass 3 कव्हर ग्लास प्रोटेक्शन सह उपलब्ध आहे.

कॅमेरा

दहा हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीतील या स्मार्टफोनमध्ये युजरला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये मुख्य कॅमेरा 50 MP आणि 2MP मायक्रो सेंसर देखील आहे. सेल्फीसाठी या मोबाईलमध्ये 8 MP फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये Night mode, Dark Vision, Tripod mode, AI portrait, 50MP mode विथ HDR, पर्सनलाईज्ड वॉटरमार्क, OZO 3D Audio recording ची वैशिष्ट्ये देखील आहेत.

बॅटरी

नोकियाचा हा स्मार्टफोन 5000mAh क्विकफिक्स बदलण्या योग्य बॅटरीसह आहे. डीव्हाइसला 3 दिवसांची बॅटरी लाइफ आहे, 20W फास्ट चार्जिंग सपोर्टसह हा फोन उपलब्ध आहे.

कलर ऑप्शन

नोकिया कंपनीने हा स्मार्टफोन ग्राहकांना विविध कलरच्या पर्यायात उपलब्ध केला आहे. तुम्ही हा फोन सो पिंक, सो पर्पल, सो ग्रे कलरमध्ये खरेदी करू शकता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.