5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

देशात 5G चाचणी सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स, एअरटेल आणि एमटीएनएलसह निवडक कंपन्यांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे.

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह 'या' बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर
5G trials
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 8:28 PM

नवी दिल्ली : देशात 5G चाचणी सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) रिलायन्स, एअरटेल आणि एमटीएनएलसह निवडक दिग्गज कंपन्यांच्या चाचण्यांना परवानगी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागाने यासाठी दूरसंचार ऑपरेटर्सना स्पेक्ट्रमचे वाटप केले आहे. (5G trial : DoT allocates 5G spectrum to Jio, Airtel, other telcos)

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, दूरसंचार क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे की, दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, हैदराबादसह विविध ठिकाणी 5G च्या चाचण्या घेण्यात येतील. या संदर्भात टेलिकॉम कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, टेलिकॉम ऑपरेटरला 700 मेगाहर्ट्झ बँड, 3.3-3-6 गीगाहर्ट्झ (GHz) बँड आणि 24.25-28.5 GHz बँडमधील विविध ठिकाणी स्पेक्ट्रमचे वाटप करण्यात आले आहे.

दूरसंचार मंत्रालयाने 4 मे रोजी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि एमटीएनएलच्या अर्जांना मंजुरी दिली होती. विभागाने त्यांना चिनी कंपन्यांच्या तंत्राचा वापर न करता 5 जी चाचणी घेण्यास सांगितले आहे. दूरसंचार विभागाने एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि सी-डॉटसह 5 जीच्या चाचणीस मान्यता दिली होती. याशिवाय रिलायन्स जिओ इन्फोकॉम (Reliance Jio Infocomm) आपल्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन चाचणी घेणार आहे.

10 पट डाउनलोड स्पीड मिळणार

दूरसंचार मंत्रालयाच्या मते, ग्राहकांना 4G च्या तुलनेत 5G तंत्रज्ञानाद्वारे दहापट चांगले डाउनलोड स्पीड आणि तीनपट स्पेक्ट्रम कार्यक्षमता मिळेल. परीक्षणादरम्यान, भारतीय सेटिंगमध्ये 5 जी ची चाचणी केली जाईल. यामध्ये टेली-मेडिसिन, टेली-एज्युकेशन आणि ड्रोन-आधारित कृषी देखरेख आदींचा समावेश असेल. याद्वारे टेलिकॉम ऑपरेटर त्यांच्या नेटवर्कवर विविध 5G उपकरणांची सहज चाचणी घेण्यास सक्षम असतील.

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेले नाही.

इतर बातम्या

5G बाबत अफवा पसरवणाऱ्यांची खैर नाही, सरकारचे कडक कारवाईचे आदेश

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

5G म्हणजे काय? भारतात कधी सुरु होणार? तुम्हाला कोणते फायदे मिळणार? जाणून घ्या सर्वकाही

(5G trial : DoT allocates 5G spectrum to Jio, Airtel, other telcos)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.