भारतात लवकरच लाँच होणार Vivo T1xचं 5G व्हर्जन… 44W फास्ट चार्जिंगसह आणखी कोणते फीचर्स? वाचा…

विवो इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून Vivo T1x भारतात लाँच करणार असल्याची घोषणा केली असून त्यानुसार हा लाँचिंग इव्हेंट 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

भारतात लवकरच लाँच होणार Vivo T1xचं 5G व्हर्जन... 44W फास्ट चार्जिंगसह आणखी कोणते फीचर्स? वाचा...
व्हिवो स्मार्टफोन्सImage Credit source: Vivo
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 8:47 PM

स्मार्टफोन कंपनी व्हिवोने Vivo T1x भारतात 20 जुलै रोजी लाँच करण्यात येणार आहे. कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया (Social media) चॅनेलद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने यासाठी मीडिया इन्व्हाइट्स पाठवण्यासही सुरुवात केली आहे. Vivo T1x चे 4G आणि 5G दोन्ही प्रकार सध्या काही निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये (Global markets) उपलब्ध केले जाणार आहे. फोनचा 4G प्रकार एप्रिलमध्ये मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. हे Qualcomm च्या Snapdragon 680 SoCने सुसज्ज असून आता कंपनी भारतात आपला 5G कनेक्टिव्हिटी (Connectivity) व्हेरिएंट लाँच करण्यास तयार आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून Vivo T1x भारतात लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. हा अपकमिंग स्मार्टफोन ब्लू आणि ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध केले जाईल. विवो इंडियाच्या वेबसाइटवर यासाठी मायक्रोसाइटही तयार करण्यात आली आहे.

काय असणार किंमत?

Vivo T1x 5Gची किंमत चीनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी अंदाजे 19,900 रुपये असू शकते. भारतात त्याची किंमत देखील अशी असण्याची शक्यता आहे. मलेशियामध्ये 4G व्हेरियंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 11,400 रुपये आहे.

काय आहेत फीचर्स?

यात 6.58 इंचाचा फुल एचडी + (1080×2408 पिक्सेल) डिसप्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा फोन octa-core MediaTek Dimensity 900 SoCने सज्ज आहे. यात 8 GB पर्यंत रॅम आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्राथमिक सेंसर 64 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेलचा दुय्यम सेंसर आहे. याशिवाय 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेंसरही देण्यात आला आहे. फोनमध्ये 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आला आहे. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरचा समावेश आहे. Vivo T1x मध्ये 5000mAh बॅटरी असेल जी 44W जलद चार्जिंगला सपोर्ट करते.

हे सुद्धा वाचा

50 मेगापिक्सेल सेंसर

Vivo T1x च्या 4G प्रकारात 6.58 इंचाचा फुल एचडी + (1080×2408 पिक्सेल) LCD डिसप्ले देण्यात आला आहे. हे ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 SoC सह उपलब्ध आहे. यात 8 GB पर्यंत रॅम आहे. या 4G मॉडेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 50 मेगापिक्सेल सेंसरचा समावेश आहे. Vivo T1x मध्ये 5000mAh बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo T1xचे स्पेसिफिकेशन्स

  1. परफॉर्मन्स – मीडियाटेक डायमेन्सिटी 900 MT6877
  2. डिसप्ले – 6.58 इंच (16.71 सेमी)
  3. स्टोरेज – 128 जीबी
  4. कॅमेरा – 64 MP + 2 MP
  5. बॅटरी – 5000 mAh
  6. रॅम – 6 जीबी
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.