6 GB RAM Mobiles: रेडमी ते सॅमसंग, 6 जीबी रॅमवाले टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 9000 रुपयांपासून…
6GB RAM Mobiles Price in India : भारतात, स्थानिक बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन ब्रँड्स आहेत. त्यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वरही शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या किंमतींचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.
6 GB RAM Mobiles: भारतात, स्थानिक बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन ब्रँड्स आहेत. त्यासोबतच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वरही शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या किंमतींचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. या यादीत रेडमी (Redmi), रियलमी, सॅमसंग, इन्फिनिक्स, टेक्नो आणि व्हिवो सारखे ब्रँड आहेत. परंतु आज आम्ही तुम्हाला 6 जीबी रॅम असलेल्या आगामी स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. या स्मार्टफोनच्या सुरुवातीच्या किंमत किफायतशीर आहेत. या यादीत मायक्रोमॅक्स इन 2 बी, रेडमी नोट 10 एस, रेडमी 9 अॅक्टिव्ह, ओप्पो ए 31, सॅमसंग गॅलेक्स एम 12 या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला 6 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीतले 9 हजार रुपयांपासून ते 14 हजार रुपयांपर्यंतचे पर्याय दाखवणार आहोत.
- Mircomax In 2B, Price 9499: मायक्रोमॅक्स इन 2 बी हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरुन 9,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये युजर्सना 6 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच, यात 6.52 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो एचडी प्लस आहे. तसेच, याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी कंपनीने 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा वापरला आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
- Redmi Note 10S, Price 14999: रेडमीचा हा फोन 6 GB रॅमसह येतो. हा एक गेमिंग स्मार्टफोन आहे. या फोनचं नाव Redmi Note 10S असं आहे. त्याची किंमत 14,999 रुपये आहे. या फोनमध्ये 64 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे.
- Redmi 9 Activ, Price 11499 : या यादीत Redmi चा आणखी एक स्मार्टफोन आहे. या फोनची किंमत 11,499 रुपये आहे, ज्यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध आहे. यात Octacore Helio G35 चिपसेट देण्यात आला आहे. याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, जो 13 + 2 MP आहे. तसेच सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. यात 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
- OPPO A31, Price 12989: ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे. तसेच 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिझोल्यूशन 1600 x 720 पिक्सेल आहे. यात 4230 mAh क्षमतेची बॅटरी आहे.
- Samsung Galaxy M12, Price 13499: सॅमसंग गॅलेक्सी एम 12 हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवरुन 13,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याच्या बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे.
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स