90 टक्के लोकं चुकीच्या पध्दतीने करतात बॅटरी चार्ज, या पाच चुकांमुळे बॅटरी लवकर उतरते
आजकाल लोकांना फोनची इतकी काळजी असते की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावतात. (Mobile Charging Tips) अशाच काही धक्कादायक गोष्टी काही अभ्यासांमध्ये समोर आल्या आहेत..
मुंबई : फोन रात्रभर चार्जवर ठेवणे, 100 टक्के चार्ज केल्यानंतरही फोन चार्जवर ठेवणे, चार्जिंग करताना फोन वापरणे. आपल्यापैकी निम्म्याहून अधिक या सर्व गोष्टी नक्कीच करत असतील. आजकाल लोकांना फोनची इतकी काळजी असते की बॅटरी संपली की लगेच चार्जिंगला लावतात. (Mobile Charging Tips) अशाच काही धक्कादायक गोष्टी काही अभ्यासांमध्ये समोर आल्या आहेत, ज्यांना पाहून असे वाटते की जवळपास 90 टक्के लोकं असे असावेत जे चुकीच्या पद्धतीने फोन चार्ज करत आहेत, ज्यामुळे बॅटरीच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो.
या चुका टाळा
- ० टक्क्यांपर्यंत डिसचार्ज होऊ देऊ नका: तुमच्या स्मार्टफोनची लिथियम-आयन बॅटरी जास्त काळ टिकण्यासाठी, ती पूर्णपणे ड्रेन होऊ देऊ नका. जर तुम्ही लिथियम-आयन बॅटरी ड्रेन होऊ देत असाल तर तुम्ही तिची क्षमता कमी करत आहात. त्यामुळे तुमचा फोन स्वीच ऑफ होण्यापूर्वी मॅन्युअली बंद करा.
- बॅटरी 40 टक्के आणि 80 टक्क्यांच्या दरम्यान असावी: स्थिर बॅटरीसाठी चार्ज पातळी वरच्या-मध्य-श्रेणीमध्ये असते. बॅटरी 40 टक्के आणि 80 टक्के दरम्यान चार्ज ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे त्याचे आयुष्य वाढेल. याचे कारण असे की उच्च व्होल्टेजची बॅटरी खूप तणावाखाली असते आणि कमी टक्के बॅटरीच्या अंतर्गत यंत्रणेवर परिणाम करू शकते.
- 100 टक्के बॅटरी चार्ज करू नका: अभ्यासात असे दिसून आले आहे की तुमची बॅटरी 100 टक्के चार्च केल्याने तीचे नुकसान होऊ शकते आणि परिणामी आयुष्य कमी होऊ शकते. तुमचा फोन कधीही 80 टक्क्यांपेक्षा जास्त चार्ज करू नका.
- थंड जागी चार्ज करा: उष्णता आणि उच्च व्होल्टेज हे दीर्घ बॅटरीचे शत्रू आहेत. तुमचा फोन शक्य तितका थंड जागी चार्ज करा.
- वारंवार चार्जिंग करणे थांबवा: बॅटरी पुन्हा पुन्हा चार्ज केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ लागते. त्यामुळे, जेव्हा बॅटरी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कमी असेल तेव्हाच चार्ज करा.