नवीन आयफोनमध्ये युएसबी टाईप-सी पोर्ट? ॲप्पलकडून लाँचिंगची तयारी, वाचा सविस्तर…

| Updated on: May 16, 2022 | 1:58 PM

सध्या iPad Pro, iPad Air आणि iPad Mini युएसबी टाईप-सी पोर्टसह उपलब्ध आहेत. तर AirPods आणि Apple TV रिमोटसह लाइटनिंग पोर्ट आयफोनद्वारे वापरले जात आहे.

नवीन आयफोनमध्ये युएसबी टाईप-सी पोर्ट? ॲप्पलकडून लाँचिंगची तयारी, वाचा सविस्तर...
आयफोन
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षा आणि बाजारपेठेतील मागणीनंतर (Market demand) आता ॲप्पल आपला आयफोन युएसबी टाईप-सी पोर्टसह लॉन्च करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे, की नवीन आयफोनमध्ये यूएसबी टाइप-सी (USB Type C) मिळेल, जो 2023 मध्ये लाँच होणार आहे. सध्या MacBook आणि iPad चे काही मॉडेल टाईप-सी पोर्टसह येत आहेत. अॅप्पलच्या आयफोनमध्ये (Apple iPhone) लाइटनिंग पोर्ट उपलब्ध असण्याचे सांगण्यात येत आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की ॲप्पल नवीन आयफोनची चाचणी यूएसबी टाइप-सी पोर्टसह करत आहे. या वर्षी लाँच झालेल्या आयफोनमध्ये लाइटनिंग पोर्ट उपलब्ध असेल, परंतु त्यानंतर, आयफोन 15 टाइप-सी पोर्टसह ऑफर केला जाईल. दरम्यान, ॲप्पलने अद्याप याबाबत कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.

सध्या iPad Pro, iPad Air आणि iPad Mini युएसबी टाईप-सी पोर्टसह उपलब्ध आहेत. तर AirPods आणि Apple TV रिमोटसह लाइटनिंग पोर्ट आयफोनद्वारे वापरले जात आहे.

युरोपियन युनियन अनेक दिवसांपासून युनिव्हर्सल चार्जरची मागणी करत आहे. सर्व गॅजेट्स चार्ज करण्यासाठी एकाच प्रकारचे चार्जर वापरावे, असे युनियनचे म्हणणे आहे. यामुळे युजर्सना सोपे होणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक कचराही कमी होईल.

ॲप्पलचे सुप्रसिद्ध विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी देखील दावा केला आहे, की 2023 मध्ये ॲप्पल आयफोन 15 मॉडेल टाइप-सी पोर्टसह लाँच करेल. ॲप्पलने पहिल्यांदा 2012 मध्ये लाइटनिंग पोर्ट आयफोन 5 सह सादर केले होते. त्यानंतर 2016 मध्ये मॅकबुक प्रोमध्ये टाइप-सी सपोर्ट देण्यात आला. ॲप्पल सध्या आयफोन 14 सीरिजवर काम करत आहे. या सीरीजअंतर्गत, iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Max आणि iPhone 14 Pro Max सप्टेंबर 2022 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.