AI ने लावले दोन मित्रांत भांडण, Elon Musk ने का घेतली कोर्टात धाव

ChatGPT Elon Musk | तर दोन मित्रांमध्ये संबंध टोकाचे ताणले गेले आहेत. जगातील दोन दिग्गजांमध्ये कटुता आली आहे. सॅम ऑल्टमन यांचे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. काही दिवसांपूर्वी ते अचानक चर्चेत आले होते. त्यांची OpenAI पण चर्चेत आली होती. आता जवळचा मित्र एलॉन मस्क त्यांच्यावर नाराज झाला आहे.

AI ने लावले दोन मित्रांत भांडण, Elon Musk ने का घेतली कोर्टात धाव
दोस्त दोस्त ना रहा
Follow us
| Updated on: Mar 07, 2024 | 3:34 PM

नवी दिल्ली | 7 March 2024 : दोन मित्रांमध्ये खटके उडाले आहेत. जगातील दोन प्रज्ञावंतात सध्या वाद पेटला आहे. एकमेकांच्या गळ्यातील ताईत असणारे दोन मित्र आता एकमेकांविरोधात उभे ठाकले आहे. जगात कृत्रिम बुद्धिमत्तेवरुन वादळ उठले आहे. ChatGPT आणि AI हे शब्द तुमच्या कानावरुन गेलेच असतील. तर या नव तंत्रज्ञानाने जगभरात नवीन क्रांती होऊ घातली आहे. पण हे यशच ChatGPT च्या मुळावर उठले आहे. तर त्यामुळेच दोन मित्रात वितुष्ट आले आहे. सॅम ऑल्टमन आणि जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात चांगलेच वाजले आहे. आहे तरी काय हा मामला?

वादाला फोडणी

तर ChatGPT ची मुळ कंपनी OpenAI आणि एलॉन मस्क यांच्यात गहिरे नातं आहे बुवा! ही कंपनीची सुरुवात होण्यापासून मस्क तिच्याशी जोडल्या गेला आहे. पण नंतर मस्क OpenAI पासून वेगळा झाला. आता मस्कने OpenAI आणि कंपनीचे सीईओ तथा मित्र सॅम ऑल्टमॅन याला थेट कोर्टात खेचले आहे. सॅमने सर्व करार तोडल्याचा आरोप मस्क याने लावला आहे. सॅम याने करार तोडत स्वतंत्र व्यवसाय थाटल्याचा आरोप मस्क याचा आहे. OpenAI मानवाच्या भल्याऐवजी मायक्रोसॉफ्टसाठी हमाली करत असल्याचा गंभीर आरोप मस्क याने लावला.

हे सुद्धा वाचा

मैत्रीचे दिन छान गोजिरे

तर एलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमॅन यांच्यात अनेक वर्षांची मैत्री आहे. दोघांची मैत्री नजर न लागण्यासारखी होती. मस्क आणि त्याची कंपनी Tesla हे सॅमच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले होते. या दोघांनी त्यांच्या चर्चेचे चॅट सुद्धा काही वर्षांपूर्वी, साधारणतः पाच वर्षांपूर्वी ट्विटरवर शेअर पण केले होते. दोघांच्या मैत्रीचा अनेकांना हेवा वाटत होता. पण आता हा इतिहास झाला आहे.

सध्याची अपडेट काय

  • तर OpenAI ही Microsoft च्या दावणीला बांधल्याचा आरोप एलॉन मस्क याने केला आहे. OpenAI ने यापूर्वीचे सर्व करार तोडले असून मायक्रोसॉफ्टच्या फायद्यासाठी ही कंपनी काम करत असल्याचा आरोप एलॉन मस्कने लावला आहे. त्याविरोधात त्याने कोर्टात पण धाव घेतली आहे. 2018 मध्ये मस्क OpenAI पासून दूर झाले.
  • एलॉन मस्क आणि वाद हे जणू समीकरणच झाले आहे. Twitter खरेदीनंतर घेतलेल्या निर्णयाने मस्क प्रचंड ट्रोल झाले होते. मस्क यांनी अनेक कार्यलय बंद केली. अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ट्विटरचे नाव बदलून एक्स केले. लोगो बदलवला, सब्सक्रिप्शन प्लॅन आणला. अजूनही ट्विटरवरचे त्याचे प्रयोग थांबलेले नाहीत. ट्विटर नफ्यात आणण्याच्या त्याच्या प्रयत्नाला अजूनही काही यश आलेले नाही. त्याने काही दिवसांपूर्वीच एक्सवर एआय चॅटबॉट Grok पण लाँच केले आहे. ते केवळ पेड युझर्ससाठी काम करते.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.