Aryan Khan Bail | आर्यन खानसाठी अभिनेत्री Juhi Chawla राहणार जामीनदार
क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याला जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी जामीन आदेशही जारी करण्यात आला आहे. तो आज (29 ऑक्टोबर) तुरुंगातून बाहेरही येऊ शकतो.
क्रूझ शिप ड्रग्ज प्रकरणात सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Drugs Case) याला जामीन मिळाल्यानंतर शुक्रवारी जामीन आदेशही जारी करण्यात आला आहे. तो आज (29 ऑक्टोबर) तुरुंगातून बाहेरही येऊ शकतो. आर्यनसह तीन आरोपींना आदल्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. आर्यनलाही अनेक अटी मान्य कराव्या लागणार आहेत, त्यापैकी एक म्हणजे तो देशाबाहेर जाऊ शकत नाही. त्यांना देशाबाहेर जायचे असेल, तर त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल.
मुंबई हायकोर्टाने दुपारी आर्यन खानला पाच पानी जामीन मंजूर केला. मात्र, त्याला एक लाखाची सुरक्षा ठेव भरावी लागणार आहे. कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला दर शुक्रवारी NCB ऑफिसमध्ये जावं लागणार आहे. तसेच न्यायालयाच्या कामकाजाबाबत ते कोणतेही वक्तव्य करू शकणार नाहीत. आर्यनची सुटका होण्यासाठी आता पुढची प्रक्रिया सुरु झाली आहे. जामीन मंजूर झाल्याची ऑर्डर लवकरच ऑर्थर रोड जेलपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे पुढच्या दोन तासात आर्यनची जेलमधून सुटका होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आर्यन खानच्या जामिनावर सही करण्यासाठी अभिनेत्री जुही चावला सेशन्स कोर्टात पोहोचली आहे.

दिशा सालियन प्रकरणातील Exclusive बातमी, ...तेव्हा दिशाच्या अंगावर कपडे

त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं

'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
