कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगोंची मुलगी गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड

मुंबई: नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी कांगो यांची गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाली आहे. मयुरी कांगो या कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांच्या कन्या आहेत. मयुरी यांनी ‘पापा कहते है’, ‘होगी प्यार की जीत’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ‘घर से निकलते ही…कुछ देर चलते ही’ या गाण्यात त्यांनी काम केलं आहे. मयुरी कांगो […]

कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगोंची मुलगी गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

मुंबई: नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी कांगो यांची गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाली आहे. मयुरी कांगो या कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांच्या कन्या आहेत. मयुरी यांनी ‘पापा कहते है’, ‘होगी प्यार की जीत’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. ‘घर से निकलते ही…कुछ देर चलते ही’ या गाण्यात त्यांनी काम केलं आहे.

मयुरी कांगो या नुकत्याच गुगल इंडियामध्ये इंडस्ट्री हेड म्हणून 4 एप्रिल 2019 रोजी रुजू झाल्या आहेत. मयुरीने यांनी याआधी परफोर्मिक्स रिझल्टट्रिक्स (Performix Resultrix) या डिजीटल मार्केटिंग एजेन्सीमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. तसेच त्यांनी नेस्ले, उबर, एअरटेल यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्येही काम केले आहे. मयुरी यांची  गुगल इंडियाच्या इंडस्ट्री हेड म्हणून नियुक्ती झाल्यामुळे औरंगाबादमधून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.

मयुरी यांनी अमेरिकेतून मार्केटिंग आणि फायनान्स विषयात एमबीएची पदवी घेतली आहे. त्या शिक्षण घेत असताना त्यांची निवड आयआयटी कानपूरसाठी झाली होती. मात्र मयुरी यांनी ही संधी न स्वीकारता चित्रपटसृष्टीमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

मयुरी यांनी 1995 मध्ये ‘नसीम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘पापा कहते है’, ‘होगी प्यार की जीत’ या चित्रपटात काम केलं. फक्त चित्रपट क्षेत्रातच नव्हे तर मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. नरगिस, थोडा गम थोडी खुशी, डॉलर बाबू आणि किट्टी पार्टी या मालिकांमध्ये काम केलं आहे. पण इतर अभिनेत्रीप्रमाणे चित्रपट किंवा मालिकांमध्ये त्यांचे सिनेसृष्टीतील करिअर यशस्वी झाले नाही. त्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीला बाय बाय करत मार्केटिंग क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला.

कोण आहेत मयुरी कांगो?

मयुरी कांगो या कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो आणि रंगकर्मी सुजाता कांगो यांची मुलगी आहे. मयूरी यांचा जन्म औरंगाबाद शहरात झाला आहे. औरंगाबादच्या सेंट झेवियर्समध्ये त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या देवगिरी कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतले. मयुरी कांगो यांनी डिसेंबर 2003 मध्ये अनिवासी भारतीय आदित्य ढिल्लन यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए केलं आहे. त्या दोघांना कियान नावाचा 8 वर्षाचा मुलगा आहे.

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.