Snapdragon 888, 48MP कॅमेरा, 4000mAh बॅटरी, शानदार स्मार्टफोन Amazon वर लाँच होणार

| Updated on: Apr 14, 2021 | 7:01 AM

कंपनीने IQoo 7 जानेवारीमध्ये 42,000 रुपयांच्या किंमतीसह लाँच केला होता. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे.

Snapdragon 888, 48MP कॅमेरा, 4000mAh बॅटरी, शानदार स्मार्टफोन Amazon वर लाँच होणार
iQoo 7
Follow us on

मुंबई : व्हिवोचा (Vivo) सब-ब्रँड असलेला iQoo7 स्मार्टफोन गेल्या वर्षी भारतात दाखल झाला होता. कंपनीने घोषणा केली आहे की, ते अमेझॉन या ई-कॉमर्स साईटच्या मदतीने लवकरच या सिरीजची भारतात विक्री करणार आहेत. कंपनीने नुकतीच घोषणा केली होती की, ते या महिन्यात त्यांचं नवं डिव्हाईस लाँच करणार आहे. गेल्या वर्षी हे डिव्हाइस फ्लिपकार्टच्या भागीदारीत लाँच केले गेले होते. डिव्हाईसच्या टीझरमध्ये कंपनीने सांगितले आहे की, या स्मार्टफोनची किंमत 40,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅग 888 प्रोसेसरसह येणार हा सर्वात किफायती स्मार्टफोन असेल. (affordable Snapdragon 888 smartphone, iQoo 7 will sale on Amazon India)

कंपनीने IQoo 7 जानेवारीमध्ये 42,000 रुपयांच्या किंमतीसह लाँच केला होता. हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस असलेलं पहिलं व्हेरिएंट आणि 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या दुसऱ्या व्हेरिएंटचा समावेश आहे. यामध्ये तुम्हाला 6.62 इंचाची एफएचडी + एमोलेड स्क्रीन मिळेल जी 120 हर्ट्झ रीफ्रेश रेट आणि 1000 हर्ट्जचा टच सॅम्पलिंग रेटसह येते. यात तुम्हाला मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, तर स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. iQOO चे संचालक (मार्केटिंग विभाग) गगन अरोरा म्हणाले की, आम्ही ग्राहकांना सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आणि उत्कृष्ट अनुभव देऊ इच्छितो. तसेच ग्राहकांसाठी आम्ही अमेझॉनसोबत भागीदारी केली आहे.

Asus ROG Phone 5  ची 15 एप्रिलपासून विक्री

भारतातील गेमर्स ज्या फोनची गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत, तो Asus ROG Phone 5 भारतात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. 15 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स साईटवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. पनीने हा स्मार्टफोन तीन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये ROG Phone 5, ROG Phone 5 Pro, आणि ROG Phone 5 Ultimate (Limited एडिशन) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या तिन्ही मॉडल्समध्ये 144Hz चा सॅमसंग AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो ROG Phone 3 पेक्षा 23 टक्के अधिक ब्राईट आहे.

किंमती

ROG Phone 5 चे तिन्ही स्मार्टफोन्स Qualcomm Snapdragon 888 ने सुसज्ज आहेत. ROG Phone 5 मध्ये 8GB आणि 12GB RAM ऑप्शन, ROG Phone 5 Pro मध्ये 16GB RAM आणि ROG Phone 5 Ultimate मध्ये 18GB RAM देण्यात आला आहे. भारतात Asus ROG Phone 5 च्या 8 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये इतकी आहे, 12 जीबी + 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 57,999 रुपये आहे. त्याचबरोबर, Asus ROG Phone 5 Pro च्या 16 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 69,999 रुपये आहे तर Asus ROG Phone 5 Ultimate च्या 18 जीबी + 512 जीबी स्टोरेज फोनची किंमत 79,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Asus ROG Phone 5 के स्पेसिफिकेशन्स

Asus ROG Phone 5 स्मार्टफोन Android 11 आधारित ROG UI आणि ZenUI कस्टम इंटरफेसवर चालतो. यात 6.78 इंचांचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे जो 20.4: 9 च्या अॅस्पेक्ट रेश्योसह येतो आणि याचा रीफ्रेश रेट 144 हर्ट्ज इतका आहे. या व्यतिरिक्त डिस्प्लेमध्ये DC Dimming सपोर्ट देण्यात आला आहे आणि तो Corning Gorilla Glass Victus ने प्रोटेक्टेड आहे.

इतर बातम्या

Flagship Fest Sale : Iphone 11, Motorola Razr 5G सह Vivo-Oppo च्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट

8GB RAM, 48MP कॅमेरा, अवघ्या 849 रुपयांत खरेदी करा 5G स्मार्टफोन

(affordable Snapdragon 888 smartphone, iQoo 7 will sale on Amazon India)