लॅपटॉप, कॉम्प्युटर नंतर आता सरकारची कॅमेरा-प्रिंटरवर नजर, आयातीवर लागू शकते बंदी

केंद्र सरकारने अलिकडे लॅपटॉप आणि संगणकाच्या आयातीवर बंदी घातली होती. त्यामुळे या वस्तू महागण्याची चिंता निर्माण झाली असतानाच आता सरकार कॅमेरा आणि प्रिंटरच्या आयातीवर देखील निर्बंध आणू शकते असे म्हटले जात आहे.

लॅपटॉप, कॉम्प्युटर नंतर आता सरकारची कॅमेरा-प्रिंटरवर नजर, आयातीवर लागू शकते बंदी
cameraImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Aug 12, 2023 | 3:50 PM

नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारने नुकताच लॅपटॉप आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध लावत त्यांना लायसन्स बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. आता अशाच प्रकारचे आयात निर्बंध कॅमेरे, प्रिंटर, हार्ड डीस्क, टेलीफोन आणि टेलिग्राफीक डीवाईसवर देखील लावण्याच्या विचारात सरकार आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या बातमीनूसार यावस्तूंची स्थानिक बाजारातील वाढती मागणी आणि मोठ्या प्रमाणात होत असलेल्या आयातीमुळे घरगुती उत्पादकांना संधी देण्यासाठी केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याच्या विचारात आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात 10 अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. त्याशिवाय सरकार युरीया, एण्टी बायोटिक्स, टर्बो जेट्स, लिथियम आयन एक्युमुलेटर, रिफाईंड कॉपर, मशीन आणि मॅकनिकल उपकरणे, सुर्यफुलांच्या बिया यासारख्या खूप जास्त आयात होणाऱ्या वस्तूंचे देखील मुल्यांकन करीत आहे. देशांतर्गत उत्पादन वाढीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात होते.

आर्थिक वर्षे 2022-23 मध्ये भारताची एकूण व्यापारी आयात 714 अब्ज डॉलर होती. ही गेल्या आर्थिक वर्षांपेक्षा 16.5 टक्के हून अधिक आहे. आयात वाढून चालू खात्यातील तोटा वाढला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षांत जीडीपीच्या 2 टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

लॅपटॉप, टॅबलेट आणि पर्सनल कॉम्प्युटरच्या आयातीवर निर्बंध 

यापूर्वी केंद्र सरकारने गेल्यावर्षी लॅपटॉप, टॅबलेट, ऑल इन वन पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा- स्मॉल फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या आयातीसाठी आयात लायसन्स बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटची आयात 5.3 अब्ज डॉलर होती. दुसरीकडे वायफाय डोंगल, स्मार्ट कार्ड रिडर आणि एड्रोइड टीव्ही बॉक्सची आयात 2.6 अब्ज डॉलर इतकी होती असे सरकारने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.