आमच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती चोरीला गेलेली नाही; Data Leak प्रकरणी Airtel चं स्पष्टीकरण
भारतातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : भारतातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या एअरटेल कंपनीच्या ग्राहकांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. रेड रॅबिट टीम या हॅकर्सच्या ग्रूपने ही माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. रेड रॅबिट टीम या ग्रुपने केलेल्या दाव्यानुसार त्यांच्याकडे एअरटेल ग्राहकांचे आधार कार्ड क्रमांक, घराचा पत्ता आणि इतर गोपनीय माहिती आहे. (Airtel denies 25 lakh customers data breach, researcher warned already in 2019)
हॅकर्सच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 25 लाखांपेक्षा जास्त युजर्सचा डेटा आहे. ही माहिती हॅकर्सना विकायची आहे. मात्र, हा हॅकर्सचा ग्रुप नेमका कुठला आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आतापर्यंत समोर आलेल्या पुराव्यांनुसार, हॅकर्सनी एक वेगळं संकेतस्थळ तयार केले होतं. मात्र, काही काळानंतर त्यांनी हे संकेतस्थळ बंद केले.
युजर्सच्या डेटाची विक्री?
एयरटेल युजर्सचा डेटा 3500 डॉलर बिटकॉइन इतक्या किंमतीत वेबवर विकण्याचा प्रयत्न सुरु आहे. सायबर सिक्योरिटी रिसर्चर राजशेखर राजारिया यांनी एक ट्विटद्वारे कंपनीच्या डेटा ब्रीचचा खुलासा केला आहे. या हॅकर्सनी ‘Red Rabbit Team’ या नावानेच एक वेबसाईट बनवली होती. राजारिया यांच्यासह इतरही अनेक रिसर्चर्सनी या डेटा लीकबाबतच्या बातमीची पुष्टी केली आहे.
याआधीदेखील एअरटेल युजर्सचा डेटा लीक झाल्याची प्रकरणं समोर आली होती. पंरतु तेव्हा ज्या युजर्सची माहिती लीक झाली आहे, त्यांची आकडेवारी मोठी नव्हती. परंतु यावेळी तब्बल 25 लाख युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या माहितीमुळे एअरटेल युजर्समध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
एअरटेल कंपनीचे स्पष्टीकरण
हॅकर्सच्या या दाव्यानंतर एअरटेल कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनी आपल्या ग्राहकांच्या गोपनयी माहितीचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या कोणत्याही ग्राहकाची माहिती चोरीला गेलेली नाही, असे एअरटेलकडून सांगण्यात आले आहे. हॅकर्सकडून देण्यात येणारी संपूर्ण माहिती खरी नाही. कारण यापैकी बहुतांश डेटा एअरटेल कंपनीचा नाही. आम्ही याबाबत संबंधित यंत्रणांना माहिती दिल्याचेही एअरटेलने सांगितले.
हॅकर्सचा दावा काय?
हॅकर्सनी प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट हा व्हीडिओ प्रदर्शित केला आहे. यामध्ये एअरटेलचा डेटाबेस एक्सिस करताना दाखवण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांची गोपनीय माहिती असल्याचा हॅकर्सचा दावा आहे. विशेष म्हणजे हॅकर्सने एअरटेल सिक्युरिटी टीमशीही चर्चा केली. यात बिटकॉइनमध्ये 3500 डॉलर्स मिळविण्यासाठी कंपनीनेही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्याने हा डेटा वेबवर लीक करत विक्रीसाठी ठेवला असावा. यासाठी हॅकर्सने एक वेबसाईट तयार करत युजर्सचा डेटा नमुना म्हणून ठेवला आहे. सध्या ही वेबसाईट उपलब्ध नाही. (Airtel customers numbers Aadhaar details data leaked)
दरम्यान एअरटेलच्या डेटाबेसमधून कोणतीही माहिती लीक होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे किंवा एखाद्या सरकारी संस्थेकडून सुरक्षेच्या कारणास्तव जतन केलेला डेटाची चोरी झाली असावी, असे बोललं जात आहे. लीक झालेल्या डेटामध्ये बहुतांश युजर्स हे जम्मू-काश्मीरमधील आहेत असे बोललं जात आहे. जम्मू-काश्मीरमधील अडीच लाख युजर्सचा डेटा लीक झाला आहे. हॅकर्सने ज्या वेबसाईटवर डेटा अपलोड केला आहे, ती वेबसाईट सध्या बंद करण्यात आली आहे. मात्र ही वेबसाईट हॅकर्सने का बंद केली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसेच एअरटेलकडूनही याचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
Another Big Data Breach? A Hacker Group alleged uploaded “shell” in @airtelindia Server. Now selling all India Airtel subscribers data including Aadhaar Number. Posted 2.5 Million as sample data. (in Jan 2021)#InfoSec #DataLeak #GDPR #databreaches #dataprotection #DataPrivacyDay pic.twitter.com/uxWopfKU0M
— Rajshekhar Rajaharia (@rajaharia) February 2, 2021
हेही वाचा
Aadhaar Card | पालकांनो लहान मुलांचे आधार कार्ड बनवलेत का? लवकरच भासू शकते गरज…
Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार
25 लाख एअरटेल ग्राहकांचा डेटा लीक; आधार कार्ड क्रमांक आणि गोपनीय माहिती हॅकर्सच्या हाती?
(Airtel denies 25 lakh customers data breach, researcher warned already in 2019)