कमी पैशात जास्तीत जास्त इंटरनेट डेटा हवाय? मग Airtel चे ‘हे’ दोन प्लॅन्स वापरा!

एयरटेल (Airtel) कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. ज्यामध्ये कॉलिंग, एसएमसएमस आणि स्ट्रिमिंमगचा समावेश केलेला असतो.

कमी पैशात जास्तीत जास्त इंटरनेट डेटा हवाय? मग Airtel चे 'हे' दोन प्लॅन्स वापरा!
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 4:32 PM

मुंबई : एयरटेलने आज ग्राहकांसाठी दोन नवीन Airtel Data Add-On Pack लाँच केले आहेत. या प्लॅन्सची किंमत 78 रुपये आणि 248 रुपये इतकी आहे. 78 रुपयांच्या Data Add-On Pack मध्ये युजर्सना 5 जीबी डेटासह Wynk Premium चं एक महिन्याचं सब्सक्रिप्शन मोफत दिलं जाईल. तर 248 रुपयांच्या डेटा अ‍ॅड ऑन पॅकमध्ये युजर्सना 25 जीबी डेटा आणि एक वर्षभरासाठी Wynk Premium चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं जाईल. कंपनीने अशा प्रकारचा प्लॅन लाँच करावा, अशी ग्राहकांची मागणी होती. कंपनीने हा प्लॅन लाँच केला असल्यामुळे आज आम्ही तुम्हाला या डेटा अ‍ॅड ऑन पॅकबाबतची माहिती देणार आहोत. (Airtel launches two Data Add-On Pack of Rs 78 and Rs 248 for its users)

78 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 5 जीबी डेटा दिला जाईल. या डेटाचा वापर ग्राहक त्यांच्या सध्याच्या प्लॅनप्रमाणे करु शकतील. याचाच अर्थ या प्लॅनची वैधता ही तुमच्या सध्याच्या प्लॅनइतकीच असेल. तसेच तुम्ही हा प्लॅन काळजीपूर्वक वाचलात तर तुमच्या लक्षात येईल की, वैधतेपूर्वीच तुमचा डेटा संपला, त्यानंतर तुम्ही Airtel Data Add-On Pack मध्ये मिळालेला डेटादेखील संपवलात तर तुम्हाला प्रति Mb डेटासाठी 50 पैसे मोजावे लागतील. म्हणजेच तुम्ही केवळ 1 जीबी डेटा वापरलात तर तुम्हाला 500 रुपये मोजावे लागतील. सोबतच कंपनीने तुम्हाला एक महिन्यासाठी मोफत Wynk Premium चं सब्सक्रिप्शन देऊ केलं आहे.

दुसऱ्या बाजूला कंपनीने 248 रुपयांचा डेटा अ‍ॅड ऑन पॅक सादर केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या डेटा प्लॅनसोबत 25 जीबी डेटा दिला जातोय. सोबतच एक वर्षभरासाठी Wynk Premium चं मोफत सब्सक्रिप्शन दिलं आहे. हा प्लॅनही युजर्सच्या सध्याच्या प्लॅनमध्ये समाविष्ट केला जाईल. म्हणजेच तुमचा सध्याचा डेटा संपला की तुम्ही 25 जीबीमधील डेटाचा वापर करु शकाल. याची वैधतादेखील तुमच्या सध्याच्या प्लॅनइतकीच असेल. तसेच तुम्ही तुमचा सध्याच्या प्लॅनमधील डेटा संपवलात आणि त्यानंतर डेटा अ‍ॅड ऑन पॅकमध्ये मिळालेला 25 जीबी डेटादेखील संपवलात तर तुम्हाला प्रति एमबी 50 पैसे मोजावे लागतील.

Airtel च्या या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार

एयरटेल (Airtel) कंपनी त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन प्लॅन्स लाँच करत असते. ज्यामध्ये कॉलिंग, एसएमसएमस आणि स्ट्रिमिंमगचा समावेश केलेला असतो. त्यासोबतच अनेक टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मोफ्त ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सब्सक्रिप्शन देत आहेत. अशातच एअरटेलने त्यांच्या ग्राहकांसाठी 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये सर्व ग्राहकांना मोफत Amazon प्राईमचं सब्सक्रिप्शन दिलं जात आहे.

हेही वाचा

Jio vs Airtel vs Vi : सर्वात स्वस्त 1GB डेली डेटा प्लॅन कोणाचा?

खुशखबर ! रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने केली ‘ही’ मोठी घोषणा, ग्राहकांना होणार मोठा फायदा

Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार

Airtel च्या ‘या’ किफायतशीर प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा आणि OTT प्लॅटफॉर्मचं मोफत सब्सक्रिप्शन मिळणार

(Airtel launches two Data Add-On Pack of Rs 78 and Rs 248 for its users)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.