Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel कडून 3 महिन्यांचं फ्री YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन

एयरटेल (Airtel) कंपनी सध्या त्यांच्या विविध प्लॅन्सची मोठ्या प्रमाणात जाहिरात करत आहे. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहे.

Airtel कडून 3 महिन्यांचं फ्री YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन
एअरटेलचे शानदार रिचार्ज प्लान, केवळ 300 रुपयात हाय स्पीड डेटासह विमा कवच
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 11:27 AM

मुंबई : एयरटेल (Airtel) कंपनी सध्या त्यांच्या विविध प्लॅन्सची मोठ्या प्रमाणात जाहिरात करत आहे. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ऑफर्स देत आहे. Airtel कंपनी सध्या युजर्सना तीन महिन्यांसाठी मोफत YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन देत आहे. युजर्स एयरटेल थँक्स अॅपद्वारे हे सब्सक्रिप्शन क्लेम करु शकतात. (Airtel offering three months Youtube Premium Subscription to users for free how to claim)

ज्यांच्याकडे YouTube प्रिमियम सब्सक्रिप्शन नाही अशा युजर्ससाठी हा फायदेशीर सौदा आहे. एका महिन्याच्या सर्व्हिससाठी ग्रहाकांना 129 रुपये मोजावे लागतात. त्यानंतर युजर्स अॅड फ्री व्हिडीओज पाहू शकतात तसेच बॅकग्राऊंडला युट्यूब म्युझिक ऐकू शकतात.

एयरटेलची ही नवीन ऑफर 22 एप्रिल 2021 पर्यंत असणार आहे. ही ऑफर युट्यूब रेड आणि गुगल प्ले म्युझिक सब्सक्रायबर्ससाठी नाही. ज्या युजरने यापूर्वीच युट्यूब म्युझिक प्रिमियम आणि गुगल प्ले म्युझिकचा वापर केला असेल अशा युजरला ही तीन महिन्यांची ऑफर मिळणार नाही. परंतु त्यांना युट्यूब प्रिमियमचं नॉन म्युझिक फिचर जरुर मिळेल.

ही ऑफर सिलेक्टेड एअरटेल युजर्ससाठीच आहे. परंतु कंपनीने एक फॉर्म जारी केला आहे. (फॉर्मसाठी इथे क्लिक करा) ज्याद्वारे युजर्स युट्यूब प्रिमियमचा मोफत वापर करु शकतात. फॉर्मद्वारे विनंती केल्यानंतर युजरला सहा महिन्यांची वाट पाहावी लागू शकते. त्यानंतर कंपनीकडून युजरला त्याच्या नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांकावर एक कोड मिळेल, ज्याद्वारे तुम्ही युट्यूब प्रिमियम सब्सक्रिप्शन मिळवू शकता.

Airtel Thanks App गरजेचं

ही ऑफर क्लेम करण्यासाठी युजरच्या स्मार्टफोनमध्ये Airtel Thanks App असणं गरजेचं आहे. या अॅपवरील More ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथे Airtel Rewards हा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर युजरला इंट्रेस्ट अॅड करावा लागेल. त्यानंतर YouTube Premium बॅनरवर क्लिक केल्यानंतर ही ऑफर क्लेम करता येईल.

ऑफर संपल्यानंतर पैसे भरा अथवा सब्सक्रिप्शन कॅन्सल करा

तीन महिन्यांच्या या प्लॅननंतर युजरला पुढील प्लॅन्ससाठी पैसे भरावे लागतील. जर युजरने तीन महिन्यात हे सब्सक्रिप्शन कॅन्सल केलं नाही तर प्रतिमहिन्याच्या दराने पैसे भरावे लागतील. कंपनीने युजर्ससाठी ट्रायलची सुविधा दिली आहे.

संबंधित बातम्या

Amazon, Flipkart Sale : दिवाळीत खरेदी करा ‘हे’ पाच स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

Honor चा 4 कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी असलेला जबरदस्त फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

(Airtel offering three months Youtube Premium Subscription to users for free how to claim)

'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी
'राज ठाकरे यांना मातोश्रीचं निमंत्रण द्या', ठाकरेंच्या सेनेची बॅनरबाजी.
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका
शेलार व्यवहारशून्य, त्याची बौद्धिक दिवाळखोरी...; मनसे नेत्याची टीका.
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?
काका-पुतण्याची बंद दाराआड बैठक; काय झाली चर्चा?.
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले
'सडकछाप, त्यांच्या अकलेचे...', विजय वडेट्टीवार भाजप नेत्यावर भडकले.
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना
राज ठाकरेंच्या मनसैनिकांना महत्वाच्या सूचना.
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप
...त्याशिवाय 26/11 शक्य नाही, भाजप नेत्याचा दावा अन् या पक्षांवर आरोप.
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र
साहेब, तुमच्या लाडक्या.. तरूणीचं टोकाचं पाऊल आईनं लिहिलं शिंदेंना पत्र.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप.
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण
मुंबई रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या प्रवाशांचे महिनाअखेरपर्यंत हाल, कारण.
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका
'ते चु*** आहेत चु***', राऊतांची शिंदे गटावर खालच्या अंगाची टीका.