Airtel च्या स्वस्त प्लानमुळे जिओची डोकेदुखी वाढली, कमी किमतीमुळे ग्राहक तुटण्याची भीती!
तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा देखील तीव्र झाली आहे. नेटवर्किंग क्षेत्रात एअरटेल आणि जिओमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. एअरटेलने आता गुपचूपपणे स्वस्त प्लान लाँच केला आहे.
मुंबई : वाढत्या तंत्रज्ञानामुळे नेटवर्किंग कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाईल कंपन्यांची चढाओढ दिसून येते. ग्राहकांना स्वस्त मस्त सेवा प्रदान करून बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा कंपन्याचा प्रयत्न असतो. आता एअरटेलने सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान लाँच केला आहे. यामुळे जिओची डोकेदुखी वाढली आहे. कारण हा प्लान तुलनेनं स्वस्त असल्याने ग्राहकांचा ओढा त्याकडे वाढण्याची शक्यता आहे. एअरटेलने जिओ बॅकअप प्लानशी स्पर्धा करण्यासाठी हा प्लान नुकताच लाँच केला आहे.
एअरटेलचा हा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान आहे. कंपनीने कोणतीही आगाऊ माहिती न देता गुपचूपणे हा प्लान लाँच केला आहे. प्लान कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे. नवीन प्लान एअरटेल एक्सस्ट्रीम फायबरच्या पोर्टफोलियाचा भाग आहे. कंपनीने हा प्लान एअरटेल एक्सस्ट्रीम फायबर लाइट नावाने लाँच केला आहे.
हा प्लानसाठी महिन्याकाठी 219 रुपये मोजावे लागतील. यामध्ये फ्री राउटर आणि फिक्स्ड स्पीड इंटरनेट सुविधा असणार आहे. तुमम्ही वर्षभराच्या सब्सक्रिप्शनवर विकत घेऊ शकता. यात युजर्सला 10 एमबीपीएसचा डेटा स्पीड मिळेल. हा प्लान फ्री राउटर सह आहे.
वर्षभरासाठी ग्राहकांना एकूण 3101 रुपये भरावे लागतील. यात जीएसटीची रक्कम सुद्धा मोजली गेली आहे. कंपनीने हा प्लान काही भागात लाँच केला आहे.
एअरटेलचा या प्लानमध्ये युजर्संना ओटीटी किंवा लाईव्ह टीव्हीची सुविधा नाही. हा प्लान बिहार, उत्तर प्रदेश पूर्व आणि आंध्र प्रदेशसाठी लाँच करण्यात आला आहे.
जिओच्या प्लानमध्ये काय?
जिओ फायबर बॅकअप प्लानची किंमत 198 रुपये आहे. यात 10 एमबीपीएसचा डेटा स्पीड, 16 ओटीटी एक्सेस, 550 लाइव्ह टीव्ही चॅनेलचं एक्सेस मिळतं. जिओची ही सुविधा पाच महिन्यांसाठीही घेता येते. तसेच हा प्लान एका दिवसासाठी वाढवूही शकता.