WhatsApp नव्हे ‘या’ अ‍ॅपचा जगभरात बोलबाला, तब्बल 60 कोटी युजर्सची पसंती

अनेक युजर्सनी WhatsApp च्या नव्या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे.

WhatsApp नव्हे 'या' अ‍ॅपचा जगभरात बोलबाला, तब्बल 60 कोटी युजर्सची पसंती
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 5:10 PM

मुंबई : नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्तींसह गोपनीयता धोरण (Privacy policy) सादर केलं आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली होती. WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. त्यामुळे अनेकांनी WhatsApp च्या या अटी मान्य करण्याऐवजी WhatsApp वापरणं बंद करण्यास प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अशा युजर्सनी अन्य इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सकडे मोर्चा वळवला आहे. त्यातही बहुतांश युजर्स हे त्यांचं WhatsApp अकाऊंट डिलीट करुन Telegram आणि Signal सारख्या इतर मेसेजिंग अ‍ॅप्सवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा WhatsApp ला जोरदार फटका बसला आहे. (alternatives to WhatsApp, Telegram is the frontrunner having added 42.9% growth in Number of users in past 1-3 years)

गेल्या तीन वर्षात WhatsApp चे 42.9 टक्के युजर्स आता टेलिग्राम हे अॅपही वापरु लागले आहेत. त्यामुळे टेलिग्रामचा आता देशात सर्वाधिक वापर होणाऱ्या अॅप्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. एका सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. हे सर्वेक्षण मार्केट रिसर्च फर्म टेकआर्कद्वारे करण्यात आलं आहे. टेकआर्कने दिलेल्या माहितीनुसार देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्सच्या यादीत व्हॉट्सअॅप सध्या पहिल्या स्थानावर आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये व्हॉट्सअॅपने 53 टक्के युजर्सची पसंती मिळवली आहे. दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षभरात सिग्नलने 47 टक्के व्हॉट्सअॅप युजर्सची पसंती मिळवली आहे.

फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतात 40 कोटींहून अधिक युजर्स आहेत. तर दुसऱ्या बाजूला टेलिग्रामचे जगभरात 60 कोटी युजर्स आहेत. गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल, टेलिग्रामच्या वापरकर्त्यांची संख्या गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे टेलिग्रामचे जे नवीन वापरकर्ते आहेत, त्यापैकी बहुतांश वापरकर्ते हे भारतीय आहेत.

WhatsApp, Signal की Telegram, कोणतं अ‍ॅप आहे बेस्ट आणि सुरक्षित?

WhatsApp

WhatsApp मध्ये युजर्सची मागणी असलेलं प्रत्येक लहान-मोठं फिचर आहे. मग ते पर्सनल अथवा ग्रुप चॅट असो किंवा व्हिडीओ/ऑडियो कॉल असेल. WhatsApp मध्ये युजर्सच्या सोयीचं प्रत्येक फिचर देण्यात आलं आहे. WhatsApp तुम्हाला इन्स्टाग्रामप्रमाणे स्टोरी अपलोड करण्याचं फिचर देतं. यात काही मर्यादादेखली आहेत, जसे की एका ग्रुपमध्ये केवळ 256 लोकांनाच सहभागी होता येतं. व्हिडीओ किंवा ऑडियो कॉलमध्ये एकावेळी केवळ 8 च जणांना सहभागी होता येतं. WhatsApp वर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करता येतात, परंतु त्यावर साईज लिमिट आहे. फोटो, व्हिडीओ आणि ऑडियो फाईल्ससाठी ही मर्यादा 16MB पर्यंत आहे. डॉक्युमेंट्सच्या बाबतीत ही मर्यादा 100MB पर्यंत आहे. परंतु युजर्स सध्या WhatsApp च्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे कंपनीवर नाराज आहेत.

Telegram App

Telegram App त्यांच्या युजर्सना अनेक फिचर्स देतं. Telegram वर तुम्हाला WhatsApp प्रमाणे चॅटिंग, ग्रुप चॅट आणि चॅनेलसारखे महत्त्वाचे फिचर्स दिले जातात. तसेच इतरही अनेक फिचर्स दिले जातात. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये, चॅनेल्समध्ये 2 लाख युजर्स सहभागी होऊ शकतात. WhatsApp मध्ये ही मर्यादा 256 इतकी आहे. टेलिग्रामवरील ग्रुप्समध्ये तुम्ही बॉट, पोल, क्विज, हॅशटॅगसह अनेक इंस्ट्रूमेंट्सचा वापर करु शकता. त्यामुळे तुमचं चॅटिंग अधिकच इंटरेस्टिंग होईल. टेलिग्राम तुम्हाला Self Destructing Messages ची सुविधा देतं. टेलिग्रामवर तुम्ही 1.5 जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता. या अॅपमध्ये अँड्रॉयड (Android) आणि आयओएस डिव्हाईसवर (iOS devices) व्हाईस आणि व्हिडीओ कॉल (video call) हे दोन्ही फिचर्स आहेत. तसेच हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे अॅप एंड टू एंड एनक्रिप्टेड आहे. या अॅपमध्ये तुम्हाला सिक्रेट चॅटचा पर्यायही देण्यात आला आहे. यापैकी कोणतंही फिचर WhatsApp मध्ये देण्यात आलेलं नाही.

Signal App

Signal App त्यांच्या युजर्सना सुरक्षित मेसेज, ऑडियो आणि व्हिडीओ कॉलसारखे फिचर्स देतं. या अॅपवरील सर्व प्रकारचे संवाद हे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted) असतात. या अॅपमध्येदेखील ग्रुप्सचा पर्याय आहे. परंतु या अॅपवर एकच मेसेज खूप लोकांना पाठवता येत नाही. या अॅपने नुकतंच ग्रुप कॉलिंग हे फिचर लाँच केलं आहे. सिग्नल अॅपमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण फिचर देण्यात आलं आहे, ते म्हणजे नोट-टू-सेल्फ (Note to Self). या फिचरद्वारे तुम्ही स्वतःला मेसेज पाठवू शकता. स्वतःचा एक वेगळा ग्रुप बनवू शकता.

संबंधित बातम्या 

सावधान! गुगलच्या एका क्लिकवर तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये कोणीही होऊ शकतं सहभागी

टेलिग्रामवर मात करण्यासाठी फेसबुककडून खोटा अपप्रचार, मार्केटिंगवर 73 हजार कोटींचा खर्च केल्याचा दावा

तुमचा WhatsApp वरील डेटा अन्य प्लॅटफॉर्म्सवर शेअर होणार, संमती न दिल्यास अकाऊंट बंद केलं जाईल

आता WhatsApp वरील चॅट्स Telegram वर मूव्ह करा, नवं फिचर लाँच

(alternatives to WhatsApp, Telegram is the frontrunner having added 42.9% growth in Number of users in past 1-3 years)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.