Google: तुम्हाला आता डॉक्टरांनी लिहिलेलं सुद्धा वाचता येणार ? पाहा गुगल काय म्हणतंय
Google: डॉक्टरांनी लिहिलेलं काहीचं समजेना ? काढा खिशातला मोबाईल, मग...
मुंबई : डॉक्टरांनी (Doctor) लिहिलेली भाषा अनेकांना समजत नाही, बरं ते समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुध्दा अनेकदा अपयश आलं आहे. डॉक्टरांची भाषा फक्त मेडिकल (Mediacal) विक्रेत्यांच्या लक्षात येते. डॉक्टरांची लिहिण्याची शैली वेगळी असल्यामुळे ते वाचण्याच्या भानगडीत सुद्धा कोणी पडतं नव्हतं. डॉक्टरांकडे जाणाऱ्या पेशंटला आता डॉक्टरांच्या भाषा समजणार आहे. त्यासाठी गुगलने (Google) एक नवं फिजर मार्केटमध्ये आणलं आहे.
गुगलने एक असं अॅप काढलं आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त खराब लिहिलेलं सुद्धा प्रत्येकाला वाचता येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांची भाषा सुद्धा लोकांना समजणार आहे.
सध्याची टेक्नोलॉजी एकदम जलदगतीने सुरु आहे. काही गोष्टी अधिक जलदगतीने पाहायला मिळत आहेत. खराब भाषा सुध्दा लोकांना वाचता यावी यासाठी एक गुगलने एक सोल्यूशन काढलं आहे. गुगलने आतापर्यंत वापरकर्त्यांसाठी अनेक चांगल्या गोष्टी आणल्या आहेत.
नवं जे अॅप येणार आहे, ते एकतर गुगल लेन्सशी कनेक्ट असू शकतं. किंवा त्याला इतर सर्च इंजिनला जोडलं जाऊ शकतं. नवं फिचर युजरकर्त्यांना लवकरचं पाहायला मिळणार असल्याचं गुगलने सांगितलं आहे.
डॉक्टरांनी लिहिलेली भाषा अनेकांना समजत नाही, परंतु ती भाषा सुद्धा लोकांना त्या फीचरच्या माध्यमातून समजेल असा दावा गुगलकडून करण्यात आला आहे.