घरातला हा डिवाईस ऐकतोयं तुमच्या बेडरूम मधले संभाषण, कोण ठेवतयं तुमच्यावर पाळत?
हे डिव्हाईस तुमचे वैयक्तिक बोलणे रेकॉर्ड करते आणि नंतर ते आपल्या सर्व्हरवर पाठवते. लोकांसाठी यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु असे होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
मुंबई : ऍमेझॉन अलेक्सा (Amazon Alexa) हा एक AI व्हॉईस असिस्टंट आहे आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरगुती उपकरणे चालवू शकता तसेच तुमच्या अनेक समस्यांचे ते समाधानही देते. विशेषत: ज्या घरांमध्ये लहान मुलं आहे अशा घरांमध्ये हे उपकरण खूप उपयुक्त मानले जाते, कारण त्यांच्या अभ्यासातही खूप मदत होते, पण काही लोकांच्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे डिव्हाइस तुमच्या गोपनीयतेमध्ये घुसखोरी करत नाही ना? जर असे असेल तर असे का होत आहे आणि ही गोष्ट कशी टाळता येईल. तुमच्या घरातही जर अलेक्सा डिव्हाईसचा वापर होत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
काय प्रकरण आहे
खरं तर, कंपनी कितीही दावा करत असली तरी काही धक्कादायक अनुभव वापरकर्त्यांनी समोर आणले आहे. अलेक्सा डिव्हाईस तुमचे वैयक्तिक बोलणे रेकॉर्ड करते आणि नंतर ते आपल्या सर्व्हरवर पाठवते. लोकांसाठी यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण आहे, परंतु असे होण्याची शक्यता खूप जास्त आहे. बर्याच लोकांनी असा दावा केला आहे की जेव्हा त्यांनी अलेक्सासमोर उत्पादनाबद्दल बोलले किंवा ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली, त्यानंतर काही वेळातच त्यांनी ते उत्पादन त्यांच्या संगणकावर आणि त्यांच्या स्मार्टफोनवर दाखवण्यास सुरुवात केली.
हे फक्त एकाच स्थितीत होऊ शकते आणि ते म्हणजे जेव्हा कोणी तुमचे ऐकत असेल आणि तेथे अलेक्सा उपस्थित असेल, तेव्हा याची शक्यता आणखी वाढते. जर हे खरे असेल, तर तुम्ही तुमच्या घरात जे काही खाजगी गोष्टी करता, त्यावर कोणीतरी लक्ष ठेवून असते आणि कोणीतरी तुमचे म्हणणे बोलणे घेत असते आणि रेकॉर्डही करत असते. तुमचे बोलणे कोणीतरी ऐकत आहे या भीतीपासून तुम्हाला मुक्त करायचे असेल तर तुम्ही तुमच्या अलेक्सा डिव्हाइसचा माइक बंद करू शकता जेणेकरून तुमचे बोलणे कुठेही रेकॉर्ड होणार नाही.