Amazon Republic vs flipkart big saving day sale : स्मार्टफोन्ससह ‘या’ वस्तूंवर बंपर डिस्काऊंट

ई-कॉमर्स जायंट अमेझॉन आणि फ्लिपकार्टने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची घोषणा केली आहे.

Amazon Republic vs flipkart big saving day sale : स्मार्टफोन्ससह 'या' वस्तूंवर बंपर डिस्काऊंट
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 12:56 PM

मुंबई : ई-कॉमर्स जायंट अमेझॉन आणि फ्लिपकार्टने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची घोषणा केली आहे. दोन्ही साईट्सवर 20 जानेवारीपासून हा सेल लाईव्ह होणार आहे. तर प्राईम मेंबर्स या सेलचा लाभ 19 जानेवारीपासून घेऊ शकणार आहेत. फ्लिपकार्टवरील सेल 20 जानेवारी ते 24 जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल. दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मस स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सूट देत आहेत. (Amazon and flipkart republic day sale, here are the list of offers)

या सेलदरम्यान ग्राहक बँक ऑफर्सचाही लाभ घेऊ शकतात. यामध्ये SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI वर 10 टक्क्यांची सूट मिळेल. बजाज फिनसर्व EMI कार्डचा वापर केल्यास तुम्हाला नो कॉस्ट EMI ची सुविधा मिळेल. तर अमेझॉनवर आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड, अमेझॉन पे, आणि सिलेक्टड डेबिट- क्रेडिट कार्ड्सवर ग्राहकांना सूट दिली जात आहे. फ्लिपकार्ट कंपनी HDFC कार्ड आणि EMI ट्रान्जॅक्शन्सवर 10 टक्क्यांची सूट देत आहे.

flipkart big saving day sale मध्ये काय स्वस्तात मिळणार?

नुकताच लाँच झालेला मोटो G 5G हा स्मार्टफोन तुम्ही फ्लिपकार्ट बिग सेविंग्स डे सेलमध्ये 18,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन 20,999 रुपये इतक्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मोटो जी हा भारतातला सर्वात स्वस्त 5G फोन असल्याचा दावा केला जातोय. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 750G सह लाँच करण्यात आला आहे.

सॅससंग गॅलेक्सी F41 हा स्मार्टफोन 13,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. डिस्काउंटमध्ये तुम्हाला एक हजार रुपयांची सूट मिळेल. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सोबतच यामध्ये Exynos 9611 प्रोसेसर, सुपर एमोलेड डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टने सॅमसंग नोट 10+ वरही डिस्काऊंट देऊ केला आहे. हा स्मार्टफोन 49,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. मोटोरोला वन फ्युजन 15,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. तर गॅलेक्सी S20+ साठी 44,999 रुपये मोजावे लागतील.

अमेझॉन रिपब्लिक डे सेलमध्ये किती डिस्काउंट

अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला वनप्लस, सॅमसंग, शाओमी, LG, Bosch, HP, लेनोवो, जेबीएल, बोट, सोनी, अमेजफिट, कॅनन, निकॉन आणि इतर प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. अमेझॉनने कोणकोणत्या वस्तूंवर किती रुपयांचा डिस्काऊंट दिला जाईल याबाबत आतापर्यंत खुलासा केलेला नाही. परंतु एका निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या ई-कॉमर्स साईटवर स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तर काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. सूट दिली जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये आयफोन 12 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी M31s, रेडमी नोट 9 प्रो, वनप्लस 8 प्रो 5G, ओप्पो A31 चा समावेश आहे.

हेही वाचा

WhatsApp चे एक पाऊल मागे, प्रायव्हसी अपडेट लांबणीवर, 8 फेब्रुवारीला काय होणार?

20 हजारात 42 इंचाची स्मार्ट टीव्ही, रिमोट सोडा आदेश द्या आणि बघा, ऐका, आनंद लुटा

अ‍ॅपलला ट्रोल करणारी सॅमसंग कंपनीसुद्धा ‘या’ स्मार्टफोनसोबत चार्जर आणि इअरफोन्स देणार नाही

(Amazon and flipkart republic day sale, here are the list of offers)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.