Amazon Republic Day Sale: खरेदी करा Oneplus 13 आणि 13R स्मार्टफोन, मिळवा 3000 ची सूट
ॲमेझॉनचा वर्षातील पहिला सेलची घोषणा झाली आहे. या दिवशी सुरू होणार आहे ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल. सेलमध्ये तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसवर बंपर डिस्काउंटचा लाभ घेऊ शकाल. हा सेल कधी सुरू होईल आणि लेटेस्ट स्मार्टफोन वनप्लस 13 आणि 13 आर वर तुम्हाला 3,000 रुपयांपर्यंत ची ऑफर कशी मिळू शकेल. ते जाणून घ्या.
नवं वर्षाचे औचित्य साधून अनेकजण नवनवीन वस्तूंची खरेदी करत असतात. अश्यातच आता नवीन वर्षानिमित्त ॲमेझॉनचा ग्रेट रिपब्लिक डे सेल लवकरच सुरू होणार आहे. या सेलमध्ये तुम्ही जवळपास प्रत्येक प्रॉडक्टवर बंपर डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकाल. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि हेडफोन आदींवर उत्तम डील्स दिल्या जात आहेत. हा सेल १३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. परंतु प्रीमियम सदस्यांना एक दिवस अगोदर या सेलचा लाभ घेता येणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. तर या सेलमध्ये खास गोष्ट म्हणजे तुम्हाला लेटेस्ट स्मार्टफोन Oneplus 13 आणि 13R च्या खरेदीवर 3000 रुपयांची बचत करता येणार आहे.
ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये बँक ऑफर्स
ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये तुम्हाला SBI क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर 10 टक्के सूट मिळू शकते. याशिवाय ICICI Amazon Pay क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अतिरिक्त सूट मिळवण्यासाठी ५ टक्के कॅशबॅक मिळू शकतो. याशिवाय हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म तुम्हाला निवडलेल्या डिव्हाइसवर ईएमआयचा पर्यायही देणार आहे.
ॲमेझॉनच्या सेलमध्ये Oneplus 13 आणि 13R स्मार्टफोनवर सूट
Oneplus 13 आणि 13R हे स्मार्टफोन नुकतेच लाँच करण्यात आले आहेत. या फोनची विक्री १० जानेवारीपासून सुरू होणार आहे. OnePlus 13 साठी ICICI बँकेच्या कार्डने पेमेंट केल्यास 5000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Oneplus 13 ची सुरुवातीची किंमत 69,999 रुपये असून तुम्हला 89,999 रुपयांपर्यंतच्या किंमतीत खरेदी करता येणार आहे.
Oneplus 13R च्या खरेदीवर तुम्हाला 3000 रुपयांपर्यंत (ICICI बँक कार्ड) सूट मिळू शकते. Oneplus 13R च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची सुरुवातीची किंमत 42,999 रुपये आहे. १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज च्या मॉडेलची सुरुवातीची किंमत ४९,९९९ रुपये इतकी आहे.
Oneplus 13 या स्मार्टफोनमधील फीचर्स
Oneplus 13 मध्ये तुम्हाला 6.82 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर आहे. हा २०२५ चा फ्लॅगशिप चिपसेट स्मार्टफोन आहे. वनप्लस १३ मध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो. याशिवाय ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा देण्यात आलेला आहे. Oneplus 13 मध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून या फोनमध्ये तुम्हाला १०० वॉट सुपरवूक चार्जिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट मिळत आहे.
त्यामुळे तुम्हाला जर Oneplus 13 आणि 13R हे स्मार्टफोन खरेदी करायचे असल्यास १३ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या ॲमेझॉनच्या सेलमधून उत्तम डिस्काउंटचा लाभ घेऊन खरेदी करा.