Amazon, LED TV : स्वस्त टीव्ही घ्यायचाय! 32 इंची एलईडी टीव्ही फक्त 7 हजारात, वाचा तुमच्या बजेटची बातमी
जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर तुम्हाला 2 हजार 790 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
मुंबई : 32 इंचाचा एलईडी टीव्ही (LED TV) सवलतीत म्हणजेच कमी दरात मिळत असेल तर कुणाला नाही आवडणार. आज बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही (Smart TV) आहेत त्यापैकी Samsung, Redmi, Sony, OnePlus सारख्या कंपन्यांचे LED टीव्ही चर्चेत असतात. हे एलईडी टीव्ही घेण्यासाठी देखील ग्राहक आकर्षीत होतात. मात्र, ते खूप महाग आहेत. प्रत्येकाच्या बजेटमध्ये ते येतातच असंही नाही. पण, बाजारात असे अनेक टीव्ही आहेत जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. तेही अगदी सहज. तुम्ही म्हणाल कमी किंमतीत म्हणजे जुने किंवा सेकंडहॅड का, तर मुळीच नाही. हे टीव्ही देखील नवेच पण कमी किंमतीचे आणि भरपूर फीचर्स देणारे. असे बरेच लोक आहेत ज्यांना स्मार्ट टीव्हीची गरज नाही आणि सामान्य एचडी टीव्ही घेणं ते लोक पसंत करतात. जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध अशाच एका HD रेडी एलईडी टीव्हीबद्दल माहिती देत आहोत. तो तुम्हाला 7 हजार 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. चला तर मग जाणून घेऊया या टीव्हीची किंमत, ऑफर्स आणि फीचर्सविषयी.
स्वस्त टीव्ही घेणार?
eAirtec 81 cms (32 इंच) HD रेडी LED TV 32DJ हा 32-इंचाचा टीव्ही 11 हजार 400 ऐवजी 7 हजार 250 मध्ये उपलब्ध असेल. यावर 4 हजार 150 रुपयांपर्यंत ऑफर दिली जात आहे. आता एवढ्या कमी किमतीत 32 इंचाचा टीव्ही मिळणार म्हणजे ऑफर चांगलीच म्हणावी लागेल. नाही का! तुम्ही 341 रुपयांचा EMI भरून देखील ते खरेदी करू शकता. याशिवाय जर तुमच्याकडे जुना टीव्ही असेल तर तुम्हाला 2 हजार 790 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यासोबत 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
टीव्हीचे फीचर्सही वाचा
वैशिष्ट्य काय आहे, हे देखील वस्तू घेण्याआधी जाणून घ्यायला हवे. यात 32-इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचे पॅनल HD आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 आहे. त्याचा रिफ्रेश दर 60Hz आहे. यात 1 HDMI पोर्ट आहे. तसेच 2 पोर्ट देण्यात आले आहेत. जे पेन ड्राइव्ह किंवा हार्ड डिस्क ड्रायव्हर्सना जोडण्यास मदत करतील. यात हेडफोन पोर्ट देखील आहे. फोनमध्ये 20W आउटपुट देण्यात आला आहे. त्याचे डिस्प्ले पॅनल A+ ग्रेड IPS आहे. हे प्रीमियम फिनिशसह येते. यामुळे आता कसलाही विचार का करताय, मोबाईल घ्या आणि स्वस्तातला टीव्ही खरी आणा.