लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई

अमेझॉन या ई-कॉमर्स साईटने या तिमाहीमध्ये विक्रमी विक्री नोंदवली आहे. अमेझॉनच्या विक्रीत तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

लॉकडाऊन काळात लोकांची जोरदार ऑनलाईन शॉपिंग, Amazon ची छप्परफाड कमाई
अ‍ॅमेझॉन देत आहे 10 हजार रुपयांपर्यंत गिफ्ट व्हाऊचर
Follow us
| Updated on: Apr 30, 2021 | 6:24 PM

मुंबई : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Pandemin Second Wave) थैमान घातलं आहे. सर्वत्र कोरोनाच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन किंवा संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. परिणामी नागरिकांना पुन्हा एकदा घरी राहावं लागत आहे. त्यामुळे बर्‍याच लोकांनी ऑनलाईन खरेदी (Online Shopping) सुरू केली आहे. अशा परिस्थितीत, ऑनलाइन शॉपिंगच्या निरंतर वाढीमुळे, अमेझॉन या ई-कॉमर्स साईटने या तिमाहीमध्ये विक्रमी विक्री नोंदवली आहे. अमेझॉनच्या विक्रीत तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमेझॉनची विक्री 108.5 बिलियन डॉलर्सवर पोहोचली आहे. (Amazon’s profit more than triples as pandemic boom continues, sales up 44 percent)

मार्चच्या तिमाहीत कंपनीचं उत्पन्न वाढून कमाई 8.1 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. 2020 च्या पहिल्या तिमाहीत कंपनीची कमाई 2.5 बिलियन डॉलर्स इतकी होती. ही आकडेवारी साथीच्या रोगाच्या काळात लाखो लोकांनी ऑनलाइन खरेदी वाढवली असल्याचे दर्शवते. गुरुवारी विस्तारित व्यापारात अमेझॉनचे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वधारले आहेत. दुसर्‍या तिमाहीत (एप्रिल ते जून) 110 अब्ज डॉलर्सवरुन 116 अब्ज डॉलर्स इतक्या महसुलाची अपेक्षा असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एका निवेदनात म्हणाले, “प्राइम व्हिडिओला आता 10 वर्ष झाली आहेत. गेल्या वर्षी 175 मिलियनहून अधिक प्राईम मेंबर्सनी शोज आणि चित्रपट स्ट्रीम केले आहेत. प्राईम व्हिडीओच्या स्ट्रीमिंग आवरमध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली आहे.

2025 पर्यंत भारतात 10 लाख नोकऱ्या निर्माण करणार

जगभरात सध्या 200 मिलियनहून अधिक पेड प्राइम मेंबर्स आहेत. अ‍ॅमेझॉनने सांगितले आहे की, भारतात जानेवारी 2020 पर्यंत त्यांनी सुमारे 300,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकर्‍या दिल्या आहेत, तर 2025 पर्यंत ही कंपनी भारतात दहा लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करेल.

कोव्हिड-19 विरुद्धच्या लढाईत अमेझॉनचं योगदान

भारताच्या कोव्हिड-19 विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात फेसबुक, अॅपल, अमेझॉन, ओप्पो आणि व्हिवो यांसह अनेक कंपन्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कंपन्या ऑक्सीजनेटर्स, श्वास घेण्याच्या मशीन्स आणि व्हेटिलेटर्ससारख्या सुविधा उपलब्ध करुन देत आहेत. या साधीच्या रोगाविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत आपलं योगदान देत आहेत. अमेझॉन इंडियाने मंगळवारी म्हटलं आहे की, त्यांनी त्यांच्या वैश्विक स्त्रोतांद्वारे 100 वेंटिलेटर्स मिळवले आहेत. हे व्हेंटिलेटर्स देशात आयात केले जातील. विमानांद्वारे हे व्हेटिंलेटर्स भारतात दाखल होतील. पुढील दोन आठवड्यांमध्ये हे व्हेटिंलेटर्स भारतात पोहोचतील, अशी माहिती अमेझॉनकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या

Amazon 10 लाख कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार, ‘यांनाही’ मिळणार लाभ

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.