मिनिटांत बाधता येणारे फोल्डेबल घर, आनंद महिंद्र यांनी केला व्हीडीओ शेअर
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या प्रेरणादायी पोस्ट युजर्सना आवडतात. जोशीमठ संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अनोख्या घराचा व्हीडीओ शेअर केला आहे. अशी घरे वरदान ठरू शकतात असे त्यांनी सुचविले आहे.
मुंबई : महिंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्र ट्वीटरवर सतत सक्रीय असतात, आणि समाजातातील घडामोडींवर भाष्य करीत असतात. त्यांनी दिलेल्या माहितीतून नेहमीच नवे ज्ञान मिळत असते. त्यांनी ट्वीटरवर एका फोल्डींगच्या घराचा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओला शेअर करताना त्यांनी ही घरे जोशीमठसारख्या नैसर्गिक संकटात फायद्याची ठरू शकतात असे म्हटले आहे. कशी आहेत ही घरे..
सध्या जोशीमठ परीसरातील घरांना गेलेल्या तड्यामुळे तेथीस रहीवाशांवर संकट निर्माण झाले आहे. अशा वातावरणात अत्याधुनिक पद्धतीने उघडझाप करून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेता येणाऱ्या फोल्डींगच्या घरांचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो असे त्यांनी म्हटले आहे. या घरांचा व्हीडीओ ट्वीटरवर व्हायरल होत आहे.
An un-foldable, 500 sq ft house for about 40L rupees. Probably could be manufactured even cheaper in India. Perfect for post-disaster shelters also. Innovation is the answer to our problems of providing affordable homes. pic.twitter.com/1CRPPpvla1
— anand mahindra (@anandmahindra) January 12, 2023
या व्हीडीओमध्ये फोल्डींगच्या घरांना अनबॉक्सेस करण्याचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. या घरांचा वापर संकटकाळात होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. आनंद महिंद्र यांनी शेअर केलेला व्हीडीओ 41 सेंकदाचा आहे. या फोल्डींगचे घर उघडताना दाखविले आहे. व्हिडिओमध्ये एक बॉक्स दिसत आहे, जो क्रेनच्या मदतीने उघडला जात आहे. हा बॉक्स एक एक लेयर उघडल्यानंतर, आत एक लक्झरी घर तयार झालेले दिसत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘500 स्क्वेअर फूटचे न फोल्डेबल घर, ज्याची किंमत 40 लाख असल्याचे म्हटले जात आहे.