Android 14 Update : अँड्रॉईड 14 लाँच, फीचर लोडेडचा या युझर्सला फायदा

Android 14 Update : गुगलने नवीन फोनमध्ये नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉईड 14 लाँच केली आहे. यामुळे कंपनीचे नवीन फीचर जोडल्या जातील. यामुळे अत्याधुनिक अनेक फीचर लोडेड असतील. युझर्सला त्याचा जबरदस्त फायदा होईल. युझर्सला या नवीन नवीन ऑपरेटिंग सिस्टिमचा जोरदार अनुभव येईल.

Android 14 Update : अँड्रॉईड 14 लाँच, फीचर लोडेडचा या युझर्सला फायदा
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 6:44 PM

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : Google ने नवीन Pixel 8 सीरीजमध्ये Android 14 चे अपडेट दिले आहे. सध्या हे अपडेट केवळ पिक्सल फोनमध्ये मिळत आहे. जर तुमच्याकडे पिक्सल स्मार्टफोन असेल तर तुम्हाला हे लेटेस्ट Android 14 अपडेट करता येईल. या नवीन अवतारात वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा आणि एक्सेसबिलिटीचे फीचर्स मिळतील. यामध्ये कंपनीने अजून एक पाऊल टाकले आहे. या फोनसोबत AI टूल्स जोडण्यात आले आहे. युनिक लॉक स्क्रीन वॉलपेपर तयार करेल. गुगलने या नवीन अपडेटविषयी माहिती दिली असली तरी इतर स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी याविषयीची माहिती दिलेले नाही. कोणत्या मोबाईलमध्ये तुम्हाला हे बदल पाहायला मिळतील?

या स्मार्टफोनमध्ये मिळतील फीचर

लेटेस्ट अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टिमचे एक्सेस Pixel 4a, Pixel 5, Pixel 5a, Pixel 6, Pixel 6 Pro, Pixel 6a, Pixel 7, Pixel 7 Pro, Pixel 7a, Pixel Fold या मॉडेलमध्ये तुम्हाला हे अपडेट मिळेल. तर Pixel 8, Pixel 8 Pro Android 14 सह लाँच झाला आहे. भारतात सध्या Pixel 5, Pixel 5a, Pixel 6 ही सीरीज उपलब्ध नाही. जर तुमच्याकडे यापैकी एखादा फोन असले तर तुम्ही Android सिस्टिम अपडेट करु शकता. त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जावे लागेल. सॉफ्टवेअर अपडेटचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करुन फोन अपडेट करावा लागेल.

हे सुद्धा वाचा

हे मिळतील फीचर

Android 14 Update केल्यावर तुम्हाला नवीन फीचर्सची माहिती मिळेल. कस्टमाईजेबल लॉक स्क्रीन क्लॉक, शॉर्टक्ट्स, मोनोक्रोम कलर थीम ऑप्शन, डेटा कलेक्शनसह इतर अनेक माहिती समोर येईल. इतरही अनेक नवीन फीचर्स मिळतील. याशिवाय युझर्सला AI Features मिळतील. हे काही दिवसात अपडेट होतील. याशिवाय स्क्रीन फ्लॅश फीचर तुम्ही इनेबल करु शकता. नोटिफिकेशन आल्यावर तुमची मोबाईलची स्क्रीन फ्लॅश होईल. तुम्ही विना पासवर्ड, ईमेलचा वापर करत लॉग इन न करता पण वेबसाईटवर लॉग इन होऊ शकता.

ओप्पोचा फोन लवकरच दाखल

ओप्पो लवकरच भारतात नवीन स्मार्टफोन दाखल करत आहे. ओप्पो फाईंड एन थ्री फ्लिप (Oppo Find N3 Flip) असे त्याचे नाव आहे. हा नवीन फ्लिप फोन लवकरच लॉन्च होईल. फोनमध्ये मोठ्या 1/1.56-इंच सेन्सरसह 50-मेगापिक्सलचा Sony IMX890 प्राथमिक कॅमेरा असेल. हा कॅमेरा विशेषत: कमी प्रकाशात उत्तम फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करण्यास सक्षम असेल. फाईंड एन थ्री फ्लिपमध्ये 32-मेगापिक्सेल IMX709 टेलिफोटो शूटर असेल.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.